मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढीपाडवा निमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवरील सभेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. यानंतर शिवसेनेची पहिली प्रतिक्रिया आली आहे. शिवसेना प्रवक्त्या शितल म्हात्रे यांनी राज ठाकरे यांना नकलाकार आणि सुपारीबाज म्हणून मनसे भाजपाची टीम सी असल्याचा घणाघात केला. तसेच राज ठाकरे भाजपाची सुपारी घेऊन वागत आहेत, असा आरोपही केला.

शितल म्हात्रे म्हणाल्या, “आप ही भाजपाची बी टीम आहे असं म्हटलं जातं, परंतु आज संपूर्ण महाराष्ट्राने भाजपाची टीम सी असलेले प्रसिद्ध नकलाकार आणि सुपारीबाज अशा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं भाषण ऐकलं. हे भाषण कुठंतरी मराठी माणसाच्या मुळावर उठल्यासारखं दिसत होतं. भाजपाची सुपारी घेऊन कशा पद्धतीने वागावं हे खरोखर या अध्यक्षांना कळलं पाहिजे.”

“असा करंटेपण करू नका”

“राज ठाकरे ईडीच्या नोटीसबद्दल बोलत होते. तुम्ही विसरत आहात की तुम्हाला जेव्हा ईडीची नोटीस आली तेव्हा उद्धव ठाकरे आपल्या पाठिशी ठामपणे उभे होते. असा करंटेपण करू नका. आज महाराष्ट्रातील मराठी माणसं, हिंदू माणसं एकत्र होत आहेत. महाराष्ट्र सरकारचं चांगलं काम चाललं आहे हे संपूर्ण जग बघतं आहे. अशावेळी हा करंटेपणा करून दुही वाढवू नका,” असं शितल म्हात्रे यांनी म्हटलं.

हेही वाचा : “देशाच्या इतक्या मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्बची गाडी सापडते आणि त्याचं…”, राज ठाकरेंचा गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ज्या भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्या प्रयत्नांना खिळ पाडून देऊ नका, एवढीच आमची विनंती आहे,” असंही म्हात्रे यांनी नमूद केलं.