मुंबई : रविवारी सायंकाळी जुहू चौपाटी येथे सहा पर्यटकांना जेलीफिशने दंश केल्यामुळे सहा जणांना रुग्णालयात दाखल करावे करावे लागले. त्यात तीन बालकांचा समावेश आहे. त्यांच्यावर उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले. रविवारी १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या सहा जणांना जेलीफिशचा दंश झाला. त्रास होऊ लागल्यामुळे या सहा जणांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मेहताब शेख(२०), दिक्षाद मेहता (५), महम्मद अहर मन्सूरी (साडेचार वर्ष), मेटविश शेख (६), मोहम्मद रजाउल्लाह (२२) , आर्थिया (२६) अशी या सहा जणांची नावे आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 14th Aug 2023 रोजी प्रकाशित
जुहू चौपाटीवर सहा जणांना जेलीफिशचा दंश
रविवारी १३ ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान समुद्रकिनाऱ्यावर गेलेल्या सहा जणांना जेलीफिशचा दंश झाला.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 14-08-2023 at 12:53 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Six people stung by jellyfish at juhu chowpatty mumbai print news zws