मुंबई : महाराष्ट्रात शासकीय अनुदानित तीन व खाजगी विनाअनुदानित चार अशी एकूण सात युनानी महाविद्यालये आहेत. मात्र एकही शासकीय युनानी महाविद्यालय नसल्याने राज्यात शासकीय युनानी महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून पहिले महाविद्यालय रायगड येथे सुरू करण्यात येणार आहे. १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे व संलग्नित १०० रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात युनानी पदवी अभ्यासक्रमाची (बीयूएमएस) तीन शासकीय अनुदानित व चार खाजगी विनाअनुदानित अशी एकूण सात महाविद्यालये आहेत. या महाविद्यालयांमधील एकूण विद्यार्थी प्रवेश क्षमता ४२० इतकी आहे. तथापि, राज्यात एकही शासकीय युनानी महाविद्यालय अस्तित्वात नाही. त्यामुळे राज्यात रायगडमधील म्हसळा तालुक्यातील सावर येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय व संलग्नित १०० रुग्णखाटांचे रुग्णालय स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मार्च २०२४ मध्ये मान्यता दिली होती.

हेही वाचा…डीआरपीपीएल नव्हे आता एनएमडीपीएल, धारावी पुनर्विकास प्रकल्प साकारणाऱ्या कंपनीच्या नावात अचानक बदल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेच्या मानकानुसार नवीन युनानी महाविद्यालय सुरू करण्यासाठी किमान १ वर्षापासून कार्यरत रूग्णालय असणे आवश्यक आहे. त्यामुळे नवीन शासकीय युनानी महाविद्यालय सुरू करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील रुग्णालये तात्पुरत्या स्वरूपात किमान ३ वर्षासाठी वापरण्यास वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने मान्यता दिली आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यात युनानी महाविद्यालय उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या नवीन युनानी महाविद्यालयाबरोबरच १०० खाटांचे नावे रूग्णालय सुद्धा उभारण्यात येणार आहे.