आठ दिवसांपूर्वी देवनार परिसरातील वृद्ध व्यावसायिकाकडील सिगारेटची एक हजार पाकिटे चोरणाऱ्याला ट्रॉम्बे पोलिसांनी अटक केली. अटक करण्यात आलेली व्यक्ती सराईत चोर असल्याचे पोलिसांनी सांगितले. मानखुर्द परिसरात वास्तव्यास असलेले अब्दुल सय्यद (७०) सिगारेट विक्रीचा व्यवसाय करीत होते. देवनारच्या पंजाबवाडी परिसरात २५ ऑगस्ट रोजी ते सिगारेटची विक्री करण्यासाठी जात होते.

हेही वाचा : गिरणी कामगारांच्या पदरी प्रतीक्षाच ; कोन, पनवेलमधील घरांचा ताबा सहा महिन्यांनंतर मिळणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी दोन आज्ञात इसमानी त्यांच्याजवळील सिगारेटची एक हजार पाकिटे चोरली. या सिगारेटची किंमत एकूण ८० हजार रुपये होती. सय्यद यांनी याबाबत ट्रॉम्बे पोलीस ठाण्यात तक्रार केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी परिसरातील सीसी टीव्ही कॅमेरातील चित्रण तपासले असता सुलतान शेखने (३२) ही चोरी केल्याचे उघड झाले. पोलिसांनी सुलतानला अटक केली असून विविध पोलीस ठाण्यात त्याच्याविरोधात २१ गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.