पायाचे दुखणे बरे करण्याच्या नावाखाली ७२ वर्षांच्या वृद्धाची तिघांनी फसवणूक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात घडल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी तिघांविरुद्ध आंबोली पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. समीर मेहता, आर. धानावाला आणि इम्रान खान अशी या तिघांची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.

अंधेरीतील न्यू लिंक रोडवरील रॉयल क्लासिक इमारतीत पाचव्या मजल्यावर वास्तव्याला असलेले तक्रारदार संतोष अयालदास टेकचंदानी (७२) यांना डाव्या पायाने चालता येत नव्हते. त्यांच्या पायावर उपचार सुरू होते. मात्र उपचार केल्यानंतरही त्यांना काहीच फरक जाणवत नव्हता. ऑक्टोंबरमध्ये त्यांची समीरशी ओळख झाली होती. आपल्या नातेवाईकालाही असाच त्रास होत होता. आर. धानावाला यांनी उपचार केल्यानंतर त्यांना आता चालता येत आहेत. त्यामुळे त्यांनीही त्यांच्याकडून उपचार करुन घ्यावा असा सल्ला समीरने त्यांना दिला.

हेही वाचा: “कन्नड रक्षण वेदिकेला काँग्रेसची फूस”, भाजपाचा गंभीर आरोप; म्हणाले, “महाराष्ट्र काँग्रेसचे नेते…”

त्याच्यावर विश्वास ठेवून टेकचंदानी यांनी धानावाला यांना त्याच्या घरी बोलाविले. त्यानंतर धानावाला व त्याचा सहाय्यक इम्रान हे दोघेही त्यांच्या घरी आले होते. या दोघांनी टेकचंदानी यांना त्यांच्या शरीरामधील रक्तातील पांढरा घटक हातचलाखीने काढून दाखविले आणि त्यांना काही औषधे दिली.

हेही वाचा: मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक; पुतळ्याची मंजुरी रखडल्याने काम वेग घेईना?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच काही दिवसांत त्यांना चालता येईल, असे त्यांनी सांगितले. या उपचारासाठी त्यांनी टेकचंदानी यांच्याकडून १० लाख १० हजार रुपये घेतले. मात्र त्यांच्या उपचारातून त्यांना काहीच फरक पडला नाही. त्यामुळे त्यांनी समीर आणि अन्य दोघांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र या तिघांचे मोबाइल बंद होते. हा प्रकार फसवणुकीचा असल्याचे लक्षात येताच त्यांनी आंबोली पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर त्यांनी समीर आणि इतर दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.