मुलाच्या फायद्यासाठी खासदार गजानन कीर्तिकर हे पक्षाशी गद्दारी करीत असल्याचा थेट आरोप शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी करताच कदम यांच्या गद्दारीचा इतिहास फार मोठा आहे, असे प्रत्युत्तर कीर्तिकर यांनी दिले. यानंतर शिंदे गटातील या दोन नेत्यांमधील वाद चिघळला आहे. यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी प्रतिक्रिया दिली. ते सोमवारी (१३ नोव्हेंबर) एबीपी माझाशी बोलत होते.

अनिल परब म्हणाले, “गजानन कीर्तीकर आणि रामदास कदम या दोन ज्येष्ठ नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेची कास धरली. ते दोघे ज्येष्ठ नेते आहेत आणि तरीही हे ज्येष्ठ नेते आज एका लोकसभेच्या जागेवरून एकमेकांश भांडत आहेत. ते दोघेही एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. कीर्तीकरांनी एक पत्रक काढलं, रामदास कदमांनी आज मुलाखत दिली. तसेच कोण गद्दार आहे, कोण सरस आहे याचे पाढे वाचत आहेत.”

wardha lok sabha seat, MP ramdas tadas , MP ramdas tadas s Son Pankaj Tadas, Pankaj Tadas defend his side, over Estranged Wife Pooja s Dispute, sushma andhare, pooja tadas, bjp, maha vikas aghadi, wardh politics, politics news
“सुषमा अंधारे यांनी माझी बाजू ऐकली असती तर विरोधात बोलल्या नसत्या,” पंकज तडस यांची प्रतिक्रिया; म्हणाले…
ajit pawar and supriya sule
“संसदेत भाषणं करून मतदारसंघाचे प्रश्न सुटत नाहीत”, अजित पवारांचे सुप्रिया सुळेंवर टीकास्र; म्हणाले, “माझी पट्टी लागली तर…”
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
girish mahajan statement on bjp mp unmesh patil
खासदार उन्मेश पाटील यांना चुकीची जाणीव होईल; गिरीश महाजन यांचा सूचक इशारा

“बाळासाहेब ठाकरे जीवंत असताना शिवसेनेचे उमेदवार पाडापाडीचं काम”

“या दोन्ही नेत्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आणि कारण देताना उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर सरकार स्थापन केल्याचा आरोप केला. तसेच बाळासाहेब ठाकरेंचे विचार घेऊन ते शिंदे गटात गेल्याचा दावा करण्यात आला. आता ते ज्या गद्दारीचे वाभाडे काढत आहेत ते बाळासाहेब ठाकरेंच्या काळातील आहेत. बाळासाहेब ठाकरे जीवंत असताना हे नेते शिवसेनेचे उमेदवार पाडापाडीचं काम करून बाळासाहेबांच्या पाठीत किती खंजीर खुपसत होते हे यावरून उघड झालं,” असा आरोप अनिल परब यांनी केला.

“बाळासाहेबांनी शिवसेनेचे उमेदवार पाडण्यास सांगितलं होतं का?”

अनिल परब म्हणाले, “उद्धव ठाकरे वाईट होते म्हणून त्यांना सोडल्याचा दावा या नेत्यांनी केला होता. तसेच ते बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराचे असल्याचाही दावा केला होता. बाळासाहेबांनी त्यांना शिवसेनेचे उमेदवार पाडण्यास सांगितलं होतं का? गजानन कीर्तीकरांनी दिलेल्या माहितीनुसार, रामदास कदम यांनी अनंत गीते यांना पाडण्याचं काम केलं. रामदास कदम यांनी त्यांना स्वतःला पाडण्याचं काम केल्याचा आरोप करत आहेत.”

हेही वाचा : “भ्रमिष्ट, गद्दार, बेईमान अन्…”; गजानन कीर्तिकरांवर टीका करताना रामदास कदमांची जीभ घसरली

“ही जागा दोघांच्या भांडणात भाजपा स्वतःकडे घेईल”

“यांनी बाळासाहेब ठाकरे जीवंत असताना त्यांच्याशी गद्दारी केली. त्यांना आज आम्ही गद्दार म्हटल्यावर राग येतो. मात्र, ते आज जे एकमेकांचे वाभाडे काढत आहेत ते त्यावेळचे आहेत. हे कितीही या जागेसाठी भांडले, तरी ही जागा दोघांच्या भांडणात भाजपा स्वतःकडे घेईल. भाजपा यांना कोणतीही जागा देणार नाही,” असा दावा अनिल परब यांनी केला.