मुंबईः सात वर्षांच्या मुलीला बाहुली देण्याच्या बहाण्याने स्वत:च्या घरी नेऊन तिच्यावर एका मुलाने अत्याचार केल्याचा प्रकार विक्रोळी येथे घडला. याबाबतचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबियांना मारहाण केल्याची तक्रार विक्रोळी पोलिसांकडे करण्यात आली आहे. याप्रकरणी विक्रोळी पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा >>> नायगाव-वरळी बीडीडीवासीयांसाठी खुशखबर; तब्बल ४६० रहिवाशांना म्हाडाच्या घराची हमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पीडित मुलगी सात वर्षांची असून ती परिसरात खेळत असताना आरोपीने मुलाने तिला बाहुली देण्याचे आमीष दाखवून तिला घरी नेले. त्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर मुलीचे आई – वडील त्या मुलाच्या घरी जाब विचारण्यासाठी गेले. त्यावेळी तेथे उपस्थित मुलाच्या  आई- वडीलांसह आणखी दोघांनी  त्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. याशिवाय पीडित मुलीच्या आईची बहीण व मुलालाही मारहाण केल्याची तक्रार विक्रोळी पोलिसांकडे करण्यात आली असून याप्रकरणी पोलिसांनी चौघांविरूद्ध विनयभंग व मारहाणीसह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपी मुलाच्या वडिलांना याप्रकरणी मंगळवारी पहाटे अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.