मुंबई : पदवी मिळवल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन प्रशासनात उत्तम पद मिळवणे, हे अनेकांचे स्वप्न असते. ते प्रत्यक्षात आणण्यासाठी नेमके काय करायला हवे, याविषयी ‘लोकसत्ता मार्ग यशाचा’ या करिअर कार्यशाळेत विशेष पोलीस महानिरीक्षक (महाराष्ट्र राज्य मानवी आयोग, मुंबई) डॉ़  रवींद्र शिसवे हे शनिवार, २८ मे रोजी मार्गदर्शन करणार आहेत़

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

  सन २००२ मध्ये परीक्षा उत्तीर्ण होऊन महाराष्ट्रभर आपला ठसा उमटवलेले डॉ़  शिसवे हे स्पर्धा परीक्षा, सनदी सेवेत असलेली आव्हाने, संधी याविषयी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत.  त्याचबरोबर सोशल मीडियातील बदलते करिअर, स्पर्धा परीक्षांची तयारी, मेडिकल इंजिनीअिरगच्या वाटा या सगळय़ा विषयांवरही विविध तज्ज्ञ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. सायबर कायदा आणि बायोटेक्नॉलॉजीसारख्या महत्त्वाच्या विषयांवरील करिअर मार्गदर्शनही या कार्यक्रमातून मिळेल.

या करिअर कार्यशाळेत दोन्ही दिवस सारखेच विषय असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक आपल्या सवडीने तारीख निवडू शकतात. कार्यक्रमासाठी नोंदणी आवश्यक आहे. तसेच ऑनलाइनसोबतच ऑफलाइन नोंदणीही आता करू शकता. रवींद्र नाटय़ मंदिर, प्रभादेवी येथे स. ९ ते १२ आणि सं. ५ ते ८ या वेळात प्रवेशिका उपलब्ध आहेत.

मुख्य प्रायोजक

गरवारे इन्स्टिटय़ूट ऑफ

करिअर एज्युकेशन अँड डेव्हलपमेंट, मुंबई युनिव्हर्सिटी

सहप्रायोजक

विद्यालंकार क्लासेस, आयटीएम ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूशन्स, सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि.

पॉवर्ड बाय

ठाकूर इन्स्टिटय़ूट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी,  व्हिसिलग वुड्स इंटरनॅशनल, क्लासरूम एज्युटेक, सुविद्या इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी,  आर. ए. सी. यू. एस ग्रुप युनिव्हर्सिटीस फॉर मेडिकल अँड इंजिनिअिरग अ‍ॅडमिशन्स

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The key success competitive exams guided lok satta marg yashacha ysh
First published on: 26-05-2022 at 00:59 IST