मुंबई: रेल्वे प्रवाशांचा चोरीला गेलेला ऐवज शोधण्यासाठी रेल्वे पोलिसांसह ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ सुरू आहे. या सुरक्षा मोहिमेद्वारे एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत १.३८ कोटी रुपयांची चोरी झालेली मालमत्ता पोलिसांनी परत मिळवली आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेशी संबंधित तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी आणि प्रवाशांसंबंधित गुन्हे रोखण्यासाठी तसेच त्याचा छडा लावण्यासाठी ‘ऑपरेशन यात्री सुरक्षा’ राबवले जात आहे. मुंबई विभागात सर्वाधिक, १६९ चोरीची प्रकरणे नोंदवण्यात आली असून त्यात २८७ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. प्रवाशांची चोरीला गेलेली ८.८८ लाखांची चोरीची मालमत्ता प्रवाशांना परत केली आहे. सोलापूर विभागात ३३ गुन्हे दाखल झाले. यात एकूण १०२ जणांवर कारवाई केली असून, प्रवाशांना ९९.२९ लाख रुपयांची मालमत्ता प्रवाशांना परत करण्यात आली.

हेही वाचा… बेस्टच्या वीजग्राहकांना विजेची छापील बिले मिळेना; बेस्टच्या कार्यालयात बिलांचे गठ्ठे पडून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भुसावळ विभागात ७७ गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण १५९ जणांना अटक केली आहे. तर २३.८० लाख रुपयांची मालमत्ता प्रवाशांना परत करण्यात आली. नागपूर विभागात चोरीच्या मालमत्तेचे ५६ गुन्हे दाखल करण्यात आले असून १७० जणांवर कारवाई करण्यात आली. एकूण ४.०९ लाख रुपयांची चोरीची मालमत्ता जप्त करून, प्रवाशांना परत करण्यात आली. पुणे विभागात चोरीच्या ३७ गुन्हे नोंद करण्यात आले. त्यात ७८ जणांवर कारवाई करण्यात आली आणि २.१० लाख रुपयांची चोरी झालेली मालमत्ता प्रवाशांना परत करण्यात आली, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली आहे.