मुंबई : मुंबईत २६/११ सारखा दहशतवादी हल्ला करण्याची धमकी शुक्रवारी ट्वीटर हँडलवरून दिली असून त्याबाबत मुंबई पोलिसांना कळवण्यात आले आहे. या ट्वीटमध्ये गुजरातमधील एका व्यक्तीचे नाव व पत्ता देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. हा खोडसाळपणा असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

मुंबईवर तालिबानशी संबंधित व्यक्ती हल्ला करणार असल्याचा ई-मेल राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) गुरूवारी प्राप्त झाला होता. आता त्यानंतर एका ट्वीटर खात्यावर मुंबईवर २६-११ सारखा हल्ला होणार असल्याचे ट्वीट प्राप्त झाले आहे. एमसीआर ट्वीटर हँडलवर हे ट्वीट मिळाला असून गुजरातमधील सूरत येथील जयूका नावाचा व्यक्तीने हल्ल्याचा कट रचला असून त्याचा मोबाईल क्रमांक व राहता पत्ता देण्यात आला आहे. त्यामुळे हा खोडसाळपणा असल्याचा पोलिसांना संशय आहे. याबाबत गुन्हे शाखाही समांतर तपास करत आहे.

BSNL, 4G, 5G, services, Central Government
बीएसएनएलला अजूनही ४ जी, ५ जीची प्रतीक्षा! केंद्र सरकारकडून दिरंगाई
nashik, malegaon, clerk arrested, ration office, Accepting Bribe, Register Needy Families, Welfare Schemes, malegaon bribe case,
नाशिक : लाच स्वीकारताना कारकुनास अटक
Francis Scott Key Bridge in Baltimore
जहाजाची धडक अन् नदीवरील ब्रिज पत्त्यासारखा कोसळला, VIDEO पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
26 year old youth murdered in bibvewadi
पुणे: बिबवेवाडी येथे तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून

हेही वाचा >>> मुंबई : शिकवणी घेणाऱ्या शिक्षकाकडून दोन मुलांवर लैंगिक अत्याचार

यापूर्वी एनआयएलाही गुरूवारी मुंबईवर हल्ल्याबाबत ईमेल मिळाला होता. तपासणीत तो पाकिस्तानातील असल्याचे निष्पन्न झाले. ई-मेलमध्ये सीआयएचा अधिकारी असल्याचे भासवण्यात आले आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पाकिस्तानातील एका क्रमांकावरुन २६/११ सारखा भीषण दहशतवादी हल्ला होणार असल्याचा संदेश आला होता. मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला एका अनोळखी क्रमांकावरून संदेश प्राप्त झाला होता. सोमालिया देशातील मोबाइल क्रमांकावरून हा संदेश पाठवण्यात आला होता. त्यात त्यांच्या देशात घडलेल्या दहशतवादी घटनांच्या अनुषंगाने खबरदारी बाळगण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या. सांताक्रुझ येथील एका व्यक्तीला घातपाताच्या धमकीचा व्हिडिओ कॉल आला होता. अशा घटनांमुळे सुरक्षा यंत्रणांवर ताण येत आहे.