लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : अटल सेतूवरून आता मुंबई-पुणे एसटी (शिवनेरी) सुरू करणे विचाराधीन असून मुंबईतच बसमध्ये ४५ प्रवासी बसल्यास अटल सेतूवरून एसटी पुणे गाठणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे शिवनेरी बसने प्रवासाचा वेळ कमी होणार आहे.

प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी अटल सेतूवरून एसटी चालवण्याचा विचार केला जात आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाने सर्वेक्षण सुरू केले असून प्रवाशांचा अभिप्राय जाणून घेतला जात आहे.

आणखी वाचा-खासगी बँकेच्या मुख्य व्यवस्थापकाच्या सायबर फसवणुकीप्रकरणी तरूणाला मध्यप्रदेशातून अटक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई-पुणे प्रत्येकी तीन फेऱ्यांमागे एक फेरी अटल सेतूवरून चालवण्याचे नियोजन सुरू आहे. काही फेऱ्या प्रायोगिक तत्त्वावर दादर- शिवडी-अटल सेतू-उलवे-पनवेल -पुणे अशा चालवणे शक्य आहे, अशी माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.