‘अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणूकीचा प्रचार आज सायंकाळी ६ वाजल्यापासून थंडावणार आहे. निवडणूक आचारसंहितेनुसार त्यानंतर जाहीर प्रचार करण्यासह विविध स्तरीय निर्बंध घालण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>धारावी पुनर्विकासासाठी फक्त एकच निविदा ?

‘१६६ अंधेरी पूर्व’ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी येत्या ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ ते सायंकाळी ६ पर्यंत मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी ७ उमेदवार रिंगणात आहेत. भारत निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार व आदर्श आचारसंहितेचा भाग म्हणून मतदान संपण्यापूर्वी ४८ तास जाहीर प्रचारावर निर्बंध लागू केले जातात. त्यामुळे आज सायंकाळी ६ वाजल्यापासून जाहीर प्रचारावर निर्बंध लागू करण्याचे आदेश अंधेरी पूर्व मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रशांत पाटील यांनी दिले आहेत.

या ४८ तासांच्या कालावधी दरम्यान उमेदवारांना त्यांच्या प्रचार व प्रसार साहित्यासाठी, तसेच जाहिरातीसाठी पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा >>>एसआरए घोटाळा: किशोरी पेडणेकर चौकशीसाठी दादर पोलीस ठाण्यात हजर

निर्बंध कोणते ?
निर्बंध कालावधी दरम्यान मद्यविक्री दुकाने व तत्सम बाबीं येथील व्यवहार, खरेदी-विक्री, देवाणघेवाण इत्यादींवर पूर्णतः बंदी असेल.

धार्मिक स्थळांचा राजकीय वापर करण्यावर निर्बंध असतील.

• एकगठ्ठा पाठवण्यात येणाऱ्या लघु संदेशांवर (एस.एम.एस.), ध्वनीक्षेपकांचा वापर,

• कोणत्याही प्रकारची सभा, जाहीर सभा घेण्यास अगर मिरवणूक काढण्यावर निर्बंध

• मतदान केंद्रापासून २०० मीटरच्या परिसरात उमेदवारांचे तात्पुरते कार्यालय, संपर्क ठिकाण उभारण्यावर निर्बंध.

• ओपिनियन पोल, सर्वेक्षण इत्यादी बाबी करण्यावर निर्बंध

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Today is the last day of andheri by election campaign mumbai print news amy
First published on: 01-11-2022 at 13:50 IST