यवतमाळ  : यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील मतदानास काही तासांचा अवधी शिल्लक आहे. अशा वेळी महाविकास आघाडीच्या उमदेवाराची काम करण्याची कार्यपद्धती कशी आहे आणि येथील मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल काय मत आहे, हे जाणून घेण्यासाठी शिवसेना उबाठाच्या उपनेत्या डॉ. ज्योती ठाकरे या यवतमाळ-वाशिम मतदारसंघात दौरा करत असल्याने विविध तर्क लावले जात आहे.

येथील शिवसेना उबाठाचे संजय देशमुख हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत. ते मतदानापूर्वीच निवडणुकीत आपण जिंकलो या पद्धतीने वागत असल्याची पक्षात ओरड आहे. शिवसेनेतील नेते, पदाधिकारी यांच्यासह मित्रपक्ष काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) या पक्षातील नेते, पदाधिकाऱ्यांनाही विचारत नसल्याने अनेकजण नाराज आहेत, असे पक्षात बोलले जात आहे. त्यांच्या या कार्यपद्धतीला कंटाळून अनेक ठिकाणी स्वपक्षीय व मित्रपक्षाचे कार्यकर्ते नाराज असल्याचा फटका निवडणुकीत महाविकास आघाडीला बसण्याची भीती व्यक्त होत आहे. शेतकऱ्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपबद्दल असलेला रोष आणि शिवसेना उबाठा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल असलेली सहानुभूती या भरवशावर ही निवडणूक आपण सहज जिंकतो, या अविर्भावात महाविकास आघाडीचा उमेदवार आहे, अशी चर्चा महाविकास आघाडीतच आहे. शिवाय पक्षाने निवडणुकीसाठी निधी दिला नसल्याचे उमेदवारासह समर्थक जाहिरपणे सांगत असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याने या कार्यपद्धतीबाबत थेट ’मातोश्री’पर्यंत तक्रारी गेल्याची चर्चा आहे.

What Aditya Thackeray Said?
“एकनाथ शिंदेंचं कॅशचं गोडाऊन सापडलं होतं, त्यानंतर मातोश्रीवर आले आणि..”, आदित्य ठाकरेंचा दावा
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
Bachhu Kadu amravati rally
अमरावतीमध्ये राडा; अमित शाह यांच्या सभेला बच्चू कडूंचा विरोध, पोलिसांसमोर ठिय्या
uddhav thackeray viral video
शरद पवारांनी उद्धव ठाकरेंना बाहेर जायला सांगितलं, ठाकरेंनी हात जोडले अन्..; भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
Eknath Shinde Raj Thackeray (1)
“दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात…”, मनसेचा शिंदे गटाला टोला; म्हणाले, “महाराष्ट्रद्रोही अन् भ्रष्टाचारी…”
ajit pawar sharad pawar
विधानसभा निवडणुकीआधी शरद पवारांबरोबर एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, “साहेब जर आम्हाला…”
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती
Amol kirtikar and ravindra waikar
मुंबईतील आणखी एक जागा शिंदेंच्या पारड्यात, अमोल कीर्तिकरांना ‘या’ कट्टर शिवसैनिकाचं आव्हान!

हेही वाचा >>> फडणवीस यांची उध्दव ठाकरेंवर टीका; म्हणाले, “त्यांना तोंडाच्या…”

येथील वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी शिवसेना उबाठाच्या उपनेत्या डॉ. ज्योती ठाकरे, संपर्क प्रमुख उद्धव कदम यांनी यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात दौरा केला. त्यांनी महाविकास आघाडीच्या उमदेवाराची कार्यपद्धती आणि त्यांच्याबद्दल जनमानसाचा कौल जाणून घेतला. त्यांनतर या दोन्ही नेत्यांनी आज मंगळवारी येथे पत्रकार परिषदेत घेत, आपण उमेदवाराची कार्यपद्धती आणि जनमत जाणून घेण्यासाठी मतदारसंघात फिरत असल्याचे स्पष्ट केले. लोकशाही विरूद्ध हुकूमशाही अशी ही निवडणूक होत आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल लोकांमध्ये सहानुभूती असल्याचे जाणवत आहे, असेही डॉ. ज्योती ठाकरे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेस यवतमाळ विधानसभा संपर्क प्रमुख संतोष ढवळे, उपजिल्हाप्रमुख प्रवीण पांडे, महिला आघाडीच्या सागर पुरी आदी उपस्थित होते.

हेही वाचा >>> नागपूर लोकसभा : मतदान करणाऱ्यांच्या संख्येत अल्प वाढ, संकेत काय?

संघटनात्मक फेरबदलाने शिवसैनिक नाराज

ऐन निवडणुकीच्या तोंडावर संजय देशमुख यांनी मातोश्रीवर पुढाकार घेवून यवतमाळ जिल्ह्यात शिवसेनेत संघटनात्मक बदल केल्याने मधल्या फळीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात नाराजी आहे. यवतमाळ शिवसेनेचा चेहरा असलेले संतोष ढवळे यांच्याबद्दल आम्हालाही आदर आहे. त्यांचा योग्य सन्मान पक्षात राखला जावा, अशीच सर्वांची भावना आहे, असे पत्रकार परिषदेत डॉ. ज्योती ठाकरे म्हणाल्या. नाराज कार्यकर्त्यांची नाराजी दूर केली जाईल. मात्र, पक्षात पक्षप्रमुखांनी निर्णय घेतल्यानंतर शिवसैनिक दिलेले काम प्रामाणिकपणे पार पाडतात, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.