मुंबई : मुंबईमधील राजकीय पक्षांचा अनुक्रमे दादरमधील शिवाजी पार्क आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील आझाद मैदानावर होणारा दसरा मेळावा, देवी विसर्जन या पार्श्वभूमीवर मुंबई पोलीस सज्ज झाले आहेत. त्यासाठी वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. परिणामी, मुंबई आणि परिसरात साडेतीन हजार वाहतूक पोलीस तैनात करण्यात येणार आहेत.

दसरा व विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पूर्व द्रुतगती माहामार्गाने, तसेच ऐरोळी मार्गे ठाण्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात येणार आहे. पूर्व द्रुतगती मार्गावर उत्तर वाहिनीने ठाण्याकडे जाणारी सर्व अवजड वाहने ऐरोली जंक्शन येथून उजवीकडे वळण घेऊन नवी मुंबई मार्गे इच्छुक स्थळी जातील. १२ ऑक्टोबर दुपारी १२ वाजल्यापासून १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत अशी वाहतूक व्यवस्था ठेवण्यात येणार आहे.

हे ही वाचा…विरुद्ध दिशेने आलेल्या दुचाकीच्या धडकेत पोलीस जखमी

दादर येथील वाहतूक व्यवस्था

वाहने उभी करण्यास प्रतिबंध :- स्वातंत्रवीर सावरकर मार्ग, (सिद्धीविनायक मंदिर जंक्शन ते एस बँक सिग्नल), केळुस्कर रोड (दक्षिण) आणि केळुस्कर (उत्तर), एम. बी. राऊत मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग, दादासाहेब रेगे मार्ग, (सेनापती बापट पुतळा ते गडकरी चौक), दिलीप गुप्ते मार्ग, (शिवाजी पार्क गेट क्र. ४ ते शितलादेवी रोड), एन. सी. केळकर मार्ग (हनुमान मंदिर ते गडकरी चौक), एल. जे. रोड (राजा बडे जंक्शन ते गडकरी जंक्शन)

हे ही वाचा…नऊ मीटर रस्त्यावरही तीन इतके चटईक्षेत्रफळ!  गृहनिर्माण धोरणात विकासकांना गाजर

दादर येथील वाहतुकीत बदल

वाहनांना प्रवेश बंदी आणि पर्यायी मार्ग :-

प्रवेश बंदी :- स्वातंत्र वीर सावरकर मार्ग (सिद्धीविनायक मंदिर जंक्शन ते कापड बाजार जंक्शन), महापालिका मार्ग, महात्मा गांधी मार्ग, हजारी महल सोमानी मार्ग

प्रवेश बंदी :- राजाबढे चौक जंक्शन ते केळुस्कर मार्ग उत्तर जंक्शनपर्यंत.

पर्यायी मार्ग :- एल. जे. रोड, गोखले रोड – रिटलमॅन जंक्शनवरून पढे गोखले रोडचा वापर करतील.

प्रवेश बंदी :- दिलीप गुप्ते मार्ग, पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन येथून दक्षिण वाहिनी.

पर्यायी मार्ग :- राजा बढे जंक्शन येथून एल. जे. रोडचा वापर करावा.

प्रवेश बंदी :- गडकरी चौक येथून केळुस्कर रोड दक्षिण व उत्तर.

पर्यायी मार्ग :- एम. बी. राऊत मार्गाचा वापर करावा.

दसरा मेळाव्यासाठी नागरिकांना घेवून येणाऱ्या वाहनांची पार्किग व्यवस्था :-

पश्चिम उपनगरे येथून पश्चिम द्रुतगती मार्गाने मेळाव्यासाठी नागरिकांना घेऊन येणाऱ्या वाहन चालकांसाठी पार्कींग.

बसेससाठी पार्किग :-

सेनापती बापट मार्ग, दादर पश्चिम

कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग, एलफिन्स्टन रोड

आझाद मैदान येथील वाहतुकीतील बदल

वाहनांना प्रवेश बंदी

महापालिका मार्ग, महात्मा गांधी मार्ग, हजारी महल सोमानी मार्ग,

वाहने उभी करण्यास बंदी

एम.जी. रोड, महापालिका रोड व हजार महल सोमानी मार्ग

पर्यायी मार्ग :-

१) अ) छत्रपती शिवाजी महाराज चौक (सी.एस.एम.टी. जंक्शन) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन :- छत्रपती शिवाजी महाराज चौक (सी.एस.एम.टी. जंक्शन) डि. एन रोड – एल. टी. मार्ग – वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन)

ब) वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) ते छत्रपती शिवाजी महाराज चौक (सि.एस. एम. टी जंक्शन ) :- वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) एल. टी. मार्ग चकाला जंक्शन – उजवे वळण – डी. एन. रोडने सी.एस.एम.टी. अशी वळविण्यात येईल.

२. अ) चाफेकर बंधू चौक (ओ.सी.एस. जंक्शन) ते वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) :- चाफेकर बंधू चौक (ओ.सी. एस. जंक्शन) उजवे वळण – हुतात्मा चौक – उजवे वळण – रामदेव पोद्दार चौक (सि.टी.आ. जंक्शन)- अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट) उजवे वळण – एम. के. रोड – आनंदीलाल पोद्दार -उजवे वळण वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) मार्ग पुढे इच्छित स्थळी जाता येईल.

ब) वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्शन) ते हुतात्मा चौक :- वासुदेव बळवंत फडके चौक (मेट्रो जंक्श न) – आनंदीलाल पोतदारमार्ग – डावे वळण महर्षि कर्वे रोड – अहिल्याबाई होळकर चौक – डावे वळण – रामदेव पोतदार चौक – वीर नरीमन रोडने पुढे हुतात्मा चौक मार्गे पुढे जाता येईल

३. चाफेकर बंधू चौक (ओ. सी. एस. जंक्शन) ते छत्रपती शिवाजी महाराज जंक्शन (सी. एस एम. टी. जंक्शन): – चाफेकर बंधू चौक (ओ.सी.एस. जंक्शन) उजवे वळण हुतात्मा चौक काळा घोडा जंक्शन – रिगल जंक्शन – डावे वळण – एस.बी.एस. रोडने पुढे इच्छित स्थळी जाता येईल

४. वालचंद हिराचंद मार्ग (बेलार्ड पिअर) एकदिशा मार्ग करण्यात येत आहे. अवतारसिंग बेदी जंक्शत ते भारत पेट्रोल पंप एक दिशा

५. अलायटिंग पॉईंट (चढ-उतार थांबे):- दसरा मेळाव्याकरीता बसेमधून येणाऱ्या कार्यकर्त्यांना खालीलप्रमाणे अलायटिंग पॉईंट देण्यात आलेले आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

१) वालचंद हिराचंद मार्ग (बेलार्ड पिअर), २) हॉर्निमल सर्कल, ३) के. बी. पाटील मार्ग, ४) गेट नं १८ सी.एस.एम. टी. रेल्वे स्थानक.