मुंबई : अरबी व उर्दू भाषा शिकवण्यासाठी घरी येणाऱ्या शिक्षकाने चार वर्षांचा मुलगा व सहा वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे. पीडित मुले भाऊ-बहिण असून याप्रकरणी पीडित मुलांच्या आईच्या तक्रारीवरून ओशिवरा पोलिसांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदयांतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी २५ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

जोगेश्वरी पूर्व येथे हा गंभीर प्रकार घडला. सहा वर्षांची मुलगी व मुलगा यांना उर्दू व अरबी भाषेचे धडे देण्यासाठी आरोपी पीडित मुलांच्या घरी येत असे. घरी कोणी नसल्याचा फायदा उचलून आरोपीने पीडित मुलांवर लैंगिक अत्याचार केले. याबाबतची माहिती पीडित मुलांच्या आईला मिळाल्यानंतर तिने ओशिवरा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला. याप्रकरणी आरोपीला शुक्रवारी अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आरोपी ४ डिसेंबर २०२२ पासून पीडित मुलांना अरबी व उर्दू भाषेचे धडे देण्यासाठी त्यांच्या घरी येत होता. त्यावेळी दिवाणखान्यात कोणीही नसल्याचा फायदा उचलून आरोपी पीडित मुलांशी अश्लील कृत्य करत होता. अखेर गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला राहत्या परिसरातून शुक्रवारी अटक करण्यात आली.