शीव येथील चम्पकलाल इस्टेट इमारतीजवळ होडा सिटीवर आदळून पडलेल्या  दुचाकीने बसने दिलेल्या धडकेमध्ये दोन तरुणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी बस चालकाला अटक केली असून होंडा सिटीच्या चालकाचा पोलीस शोध घेत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शीव येथील चम्पकलाल इस्टेट इमारतीजवळ गुरुवारी सकाळी एक होंडा सिटी गाडी उभी होती. गाडीच्या चालकाने दरवाजा उघडला आणि त्याच वेळी मागून आलेली दुचाकी त्यावर आदळली आणि दूरवर फेकली गेली. त्याला बसगाडीने धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेले कौशल यादव (२०) आणि श्रावण बोराना (२०) हे दोघे गंभीर जखमी झाले. या दोघांना शीव रुग्णालयात नेण्यात आले. मात्र या दोघांचा मृत्यू झाला. या प्रकरणी बसचालक नीलेश लाटे याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

छेडछाडीला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या

मालेगाव: सततच्या छेडछाडीला कंटाळून मोनाली हिरामण खरे या बावीस वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीने विषारी पदार्थ सेवन करून आत्महत्या करण्याची घटना शहरातील जाजूवाडी भागात घडली. या प्रकरणी जय शेलार (२६) या संशयिताला पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

 

मैत्रेयच्या गुंतवणूकदारांना प्रथमच परतावा

नाशिक: जादा परताव्याचे अमिष दाखवत कोटय़वधींची फसवणूक करणाऱ्या मैत्रेय ग्रुप ऑफ कंपनीज्च्या प्रकरणातील गुंतवणूकदारांना शुक्रवारपासून परतावा देण्यास सुरूवात होत आहे. प्रारंभी नाशिकमधील आणि नंतर राज्यातील इतर भागातील गुंतवणूकदारांना परतावा दिला जाणार आहे. देशात आजवर उघडकीस आलेल्या या स्वरुपाच्या घोटाळ्यांमध्ये गुंतवणूकदारांना अतिशय कमी कालावधीत पैसे परत मिळण्याची ही पहिलीच वेळ असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

 

माजी आमदाराविरोधात बलात्काराचा गुन्हा

नागपूर : चंद्रपूरचे माजी आमदार अविनाश वारजूरकर याने मित्राच्याच पत्नीवर अत्याचार केल्याची  घटना उघडकीस आली आहे. त्याच्याविरुद्ध भंडारा शहर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. तो फरार असल्याचे सांगण्यात येते. अविनाश वारजूरकर चिमूर मतदारसंघाचा माजी आमदार आहे. याशिवाय २०१४ च्या निवडणुकीत तो काँग्रेसचा उमेदवारही होता. खनिकर्म महामंडळाचाही तो अध्यक्ष होता. पीडित महिलेचा पती आणि वारजूरकर चांगले मित्र आहेत. त्यांचा भागीदारीत व्यवसायही आहे. यातून त्यांची ओळख पीडित महिलेशी झाली.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Two young men killed in sion accident
First published on: 29-07-2016 at 00:47 IST