मागील महापालिका निवडणुकांदरम्यान, मुंबईकरांना मोफत ‘वाय-फाय’ सुविधा उपलब्ध करून देणार असल्याच्या वक्तव्यावर मुंबई महानगरपालिकेने आता ‘यू-टर्न’ मारत ‘वाय-फाय’ सुविधेसाठी मुंबईकरांना शुल्क भरावे लागण्याची शक्यता शिवसेना नगरसेवक आणि महापालिकाचे महापौर सुनिल प्रभू यांनी म्हटले आहे.
सुनिल प्रभू म्हणाले, “वाय-फाय उपलब्ध करून देण्याच्या आर्थिक अंदाजपत्रकावर आम्ही काम करत आहोत आणि येत्या दोन महिन्यात हा प्रकल्प सुरू होईल अशी आमची आशा आहे. प्राथमिक तत्वावर नागरिकांना यासाठी शुल्कही भरावे लागण्याची शक्यता आहे.” असेही ते म्हणाले.
वाय-फाय उपलब्ध करुन देण्याच्या पहिल्या टप्प्यात मुंबई महानगरपालिका ही योजना दक्षिण मुंबईतील सीएसटी, दलाल पथ, डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी मार्ग, हुतात्मा चौक आणि महात्मा गांधी मार्ग याठिकाणी सुरू करण्याच्या विचारात आहे. या सुविधेतून नागरिकांना वरील भागात कोणत्याही ठिकाणी वाय-फायच्या माध्यमातून इंटरनेट मोफत वापरता येणार आहे. यात बस, रेल्वे स्थानक अशा सार्वजनिक ठिकाणीही इंटरनेट वापरता येणार आहे. यासाठी उभारण्यात येणारे टॉवर्स, त्यांना लागणाऱया जागा माहापालिकेद्वारे निश्चित करण्यात आलेल्या आहेत. मुळात हा प्रकल्प महापालिका २००८ सालीच सुरू करणार होती परंतु, मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यामुळे हा वाय-फाय प्रकल्प बारगळला होता.
संग्रहित लेख, दिनांक 24th Dec 2013 रोजी प्रकाशित
‘वाय-फाय’ सुविधा मोफत मिळण्याची शक्यता कमी; महापालिकेचा ‘यू-टर्न’
मुंबईकरांना मोफत 'वाय-फाय' सुविधा उपलब्ध करून देणार असल्याच्या वक्तव्यावर मुंबई महानगरपालिकेने आता 'यू-टर्न' मारत 'वाय-फाय' सुविधेसाठी मुंबईकरांना शुल्क भरावे लागण्याची शक्यता शिवसेना

First published on: 24-12-2013 at 01:52 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: U turn bmc might charge you for its wifi service