मुंबई : दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून अरविंद सावंत यांच्या उमेदवारीची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी केली. त्यांना पुन्हा चांगल्या मतांनी निवडून देण्याचे आवाहनही त्यांनी केले. राहुल नार्वेकर हे भाजपचे उमेदवार असले आणि प्रचाराला आल्यास त्यांना खरी शिवसेना कोणती, असा प्रश्न विचारा, असेही ठाकरे म्हणाले.

हेही वाचा >>> वर्षभरात आरोग्य सुविधेवर सात हजार कोटी खर्च करणारी मुंबई महानगरपालिका देशातील एकमेव – मुख्यमंत्र्यांनी

देशातील अनेक कारखान्यांवर छापे टाकून कारखानदारांना निवडणूक रोखे देण्यास भाग पाडले गेले आहे. काही उद्याोजकांना या रोख्यांच्या बदल्यात देशात मोठे प्रकल्प दिले गेले आहेत. गेली दहा वर्षे काँग्रेसने देश लुटला असा प्रचार केला जात आहे. मात्र भाजपचे सात आठ हजार कोटी रुपयांचे निवडणूक रोखे पाहता हा देश भाजपने लुटल्याचे स्पष्ट दिसून येते, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कफ परडे येथील सभेत भाजपवर केली.

हेही वाचा >>> महानगरपालिका आयुक्तांच्याच बंगल्याची १४ वर्षांपासून कर थकबाकी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबईच्या दक्षिण भागात ठाकरे यांनी शुक्रवारी अनेक शाखांना भेटी दिल्या. कफ परेड येथे आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभेत त्यांनी केंद्र सरकार व भाजपवर जोरदार टीका केली. देश कोण लुटत आहे याचा विचार केला तर लक्षात येईल की भाजपने रोखे जमा करून हा देश लुटला आहे. त्यासाठी उद्याोजकांना धमकावण्यात आले आहे. देश विकसित करण्यासाठी भाजपने २०१४, २०१९ मध्ये सत्ता मागितली. आता २०२४, २०२९ साठी सत्ता न मागता थेट २०४७ साठी सत्ता मागितली जात आहे. हा देश लुटण्यासाठी भाजपला पुन्हा सत्ता देणार का, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात विरुद्ध सर्व राज्ये असा एक भेदभाव निर्माण करीत आहेत. गुजराती आणि मराठी दुधात साखर मिसळावी असे एक झालेले असताना मोदी सर्व उद्योग गुजरातमध्ये नेऊन दोन राज्यांतील जनतेत दरी निर्माण करीत असल्याचा आरोप ठाकरे यांनी केला.