scorecardresearch

Premium

VIDEO : “पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या, भाजपाला भरघोस यश मिळालं, आता…”, उद्धव ठाकरेंनी दिलं थेट आव्हान

शिवसेनेच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या ‘शिवालय’ कार्यालयाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर ते बोलत होते.

Uddhav-thackeray
उद्धव ठाकरेंनी महापालिका निवडणुकीवरून भाजपाला आव्हान दिलं आहे. ( संग्रहित छायाचित्र )

राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, तेलंगणा, मिझोरामच्या निवडणुका झाल्या आहेत. या निवडणुकीत भाजपाला भरघोश यश मिळालं आहे. आता, मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा, असं आव्हान शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपाला दिलं आहे. तसेच, मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवावी, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

शिवसेनेच्या नुतनीकरण करण्यात आलेल्या ‘शिवालय’ कार्यालयाचं उद्धव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

Nitish Kuma
“मी मरण पत्करेन, परंतु…”, एनडीएत सहभागी होण्याच्या चर्चेदरम्यान नितीश कुमारांचा ‘तो’ VIDEO व्हायरल
celebration in Satara
सातारा : राज्य सरकारच्या निर्णयानंतर साताऱ्यात जल्लोष
Nirmala Sitharaman asserted that the government has succeeded in delivering social schemes to the intended beneficiaries
सामाजिक योजना इच्छित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यात सरकारला यश – सीतारामन
Criminal order against Rahul Gandhi on the charge of inciting the crowd
राहुल गांधींवर गुन्ह्याचे आदेश; गर्दीला चिथावणी दिल्याचा आरोप, सरमांकडून ‘नक्षलवादी’ म्हणून उल्लेख

उद्धव ठाकरे म्हणाले, “राजस्थान, छत्तीगसड आणि मध्य प्रदेशच्या निवडणुकीत भाजपाला भरघोस यश मिळालं आहे. आता, मुंबई महापालिकेची निवडणूक घेऊन दाखवा. एवढी तुमची लाट असेल, तर लोकसभेची एक निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या. आमच्याही मनात काही शंका नको. सगळं वातावारण विरोधात आहे. एक्झिट पोल आणि उलटेपालटे करणारे निकाल लागत आहेत. मग, हे कसं घडलं? हा प्रश्न मतदारांना पडत असेल. ती शंका दूर करण्यासाठी एकच निवडणूक दम असेल, तर बॅलेट पेपरवर घ्या.”

हेही वाचा : “…तर निवडणुकीत देव-धर्माचे मुद्दे मांडल्यास तुम्ही आमच्यावर कारवाई करू शकत नाही”, उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला इशारा

“बॅलेट पेपरची मतमोजणी करण्यासाठी वेळ लागतो. लोकशाही आणि देशाचं भवितव्य ठरवणाऱ्या निवडणुकीला मतमोजणीसाठी दोन-तीन दिवस लागले, तर काय फरक पडतो. महापालिका निवडणूक एक-दोन वर्ष झालं पुढं ढकलण्यात आली आहे. त्यात वेळ जात नाही का?” असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा : “बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या”; राऊतांच्या वक्तव्यावर अजित पवार गटाच्या नेत्याचं उत्तर, म्हणाले, “जनादेश…”

“तुमच्यात हिंमत आणि आत्मविश्वास असेल, तर लोकसभेची निवडणूक देशभर बॅलेट पेपरवर घेऊन जिंकून दाखवावी. नाही, तर मुंबई महापालिकेची निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा,” असं आव्हानही उद्धव ठाकरेंनी भाजपाला दिलं आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Uddhav thackeray challenge bjp mumbai corporation election after victory rajasthan madhya pradesh and chhatisgarh ssa

First published on: 05-12-2023 at 14:13 IST

आजचा ई-पेपर : मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×