मुंबई : किनारपट्टी रस्त्याच्या मार्गिकेचे उद्घाटन, बहुचर्चित वाढवण बंदराचे भूमिपूजन यांसह विविध प्रकल्पांच्या कामांचे लोकार्पण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईला येणार होते, मात्र त्यांच्या मुंबई दौऱ्याबाबत अनिश्चितता आहे.
हेही वाचा >>> महिलांच्या सर्वांगीण विकासाचे नवे धोरण लागू
लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी देशभरात विविध प्रकल्पांचे लोकार्पण, भूमिपूजन व कार्यक्रमांसाठी मोदींचे दौरे होत असून राजकीय व शासकीय बैठकांमध्येही ते व्यग्र आहेत. त्यामुळे मुंबईतील प्रकल्पांचे लोकार्पण व भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते सोमवारी किंवा मंगळवारी ऑनलाइन होण्याची शक्यता असल्याचे उच्चपदस्थ सूत्रांनी सांगितले. निवडणूक आयोगाकडून १२ ते १४ मार्च या काळात लोकसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने मोदी यांना दौऱ्यासाठी वेळ नसल्यास ऑनलाइन कार्यक्रम करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा सुरू असल्याचे संबंधितांनी नमूद केले.
