मुंबई : प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या आंतराष्ट्रीय अभिरूप न्यायालय स्पर्धेत मुंबई विद्यापीठाच्या ‘लॉ ॲकॅडमी’मधील (उमला) विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. नेदरलँड येथे  २ ते ९ जून २०२३ या कालावधीत होणाऱ्या या स्पर्धेसाठी मुंबई विद्यापीठाच्या नाथन शिंदे, विष्णूप्रिया भोसले, नेक पूरी, आर्या गौतम आणि आरुषी केनिया हे विद्यार्थी विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करतील.  शहरातील आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयात हे विद्यार्थी मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.

हेही वाचा >>> वांद्रे रेक्लमेशनमध्ये ‘मुंबई आय’ उभारण्यास स्थानिकांचा विरोध; रहिवाशांच्या विरोधानंतर प्रकल्प हलविण्याचा एमएमआरडीएचा निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नेदरलँडमधील लिडेन विद्यापीठाच्या सहकार्याने आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने सदर स्पर्धेचे आयोजन केले असून तब्बल ८० देशांमधील संस्था सहभागी होणार आहेत. आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाने दिल्लीतील राष्ट्रीय विधी विद्यापीठामार्फत १६ ते १९ मार्च २०२३ या कालावधीत स्पर्धेचे भारतात आयोजन केले होते. देशातील विविध विद्यापीठांमधील ३५ संस्था या स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. मुंबई विद्यापीठाच्या ‘लॉ ॲकॅडमी’तील विद्यार्थ्यांनी वॉर क्राईम, क्राईम्स अगेन्स्ट ह्युमॅनिटीज् आणि इकोसाईड या नाविन्यपूर्ण विषयांवर सादरीकरण करून, पहिल्या पाच संघांमध्ये येण्याचा बहुमान पटकावला.  ‘लॉ ॲकॅडमी’च्या संचालिका प्रा. राजेश्री वऱ्हाडी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.