मुंबई : पवई येथील भारतीय तंत्रज्ञान संस्थेत (आयआयटी मुंबई) सुरक्षा व्यवस्था भेदून एक अनोळखी तरूण शिरल्याचा प्रकार उघडकीस आला. बिलाल अहमद फैय्याद अहमद तेली (२२) असे या तरूणाचे नाव आहे. तो कर्नाटकमधील मंगळूर येथील रहिवासी आहे. त्याचा उद्देश काय होता ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. पवई पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

संस्थेच्या सभागृहात १७ जून रोजी व्याख्यान सुरू असताना बिलाल अहमद फैय्याद अहमद तेली तेथे हजर असल्याचे आढळले होते. त्याला सुरक्षा रक्षकांनी ताब्यात घेतले आणि पवई पोलिसांकडे सुपूर्द केले. तो २ ते ७ जून या कालवाधीत आयआयटीच्या परिसरातील वसतिगृहात बेकायदेशीरपणे रहात होता, अशी कबुली त्याने दिली. तो ४ जून रोजीही आयआयटीच्या विभागप्रमुख शिल्पा कोटीवाल यांना दिसला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्याच्याकडे ओळखपत्राची मागणी केली असता तो पळून गेला. कोटीवाल यांना १७ जून रोजी तो अनोळखी तरूण पुन्हा दिसल्याने त्यांनी सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले. या घटनेमुळे आयआयटीच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.