लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : फटाक्यांचे आमिष दाखवून आठ वर्षांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना ॲन्टॉप हिल परिसरात घडली. घडलेला प्रकार कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी आरोपीने मुलाला दिली. याप्रकरणी ॲन्टॉप हिल पोलिसांनी अनैसर्गिक अत्याचार, धमकावणे व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून ३२ वर्षीय आरोपीला अटक केली. विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार, हावभाव किंवा कृती केल्याप्रकरणी आरोपीविरोधात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत.

पीडित मुलगा व त्याचा मित्र दोघेही सोमवारी घराजवळ फटाके फोडत होते. त्यावेळी आरोपीने तेथे जाऊन पीडित मुलाला फटाके देण्याचे आमिष दाखविले. त्यानंतर एका इमारतीत नेऊन आरोपीने पीडित मुलावर अत्याचार केला. तसेच घडलेला प्रकार कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. पीडित मुलाने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर मंगळवारी ॲन्टॉप हिल पोलिसांनी याप्रकरणी अनैसर्गिक अत्याचार, ठार मारण्याची धमकी व पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.

आणखी वाचा-भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

३२ वर्षीय आरोपी सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्याविरोधात दोन गुन्हे दाखल आहेत. विनयभंग करण्याच्या उद्देशाने शब्दोच्चार, हावभाव किंवा कृती केल्याप्रकरणी भादंवि कलम ५०९ अंतर्गत आरोपीविरोधात ॲन्टॉप हिल व माटुंगा पोलीस ठाण्यात यापूर्वी दोन गुन्हे दाखल आहेत. त्यातील ॲन्टॉप हिल पोलीस ठाण्यात २०१७ व माटुंगा पोलीस ठाण्यात २०१८ मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती सूत्रांनी दिली. याप्रकरणी ॲन्टॉप हिल पोलीस आधिक तपास करीत आहेत.