सिने आणि टीव्ही अभिनेते सुरेश चटवाल यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. एफआयआर या मालिकेत काम करणा-या सुरेश यांचे शनिवारी मुंबईत निधन झाले.
सुरेश यांचे चिरंजीव यमन चटवाल यांनी याबाबत माहिती दिली. एफआयआर मालिकेतील सुरेश यांची सहकलाकार कविता कौशिक हिनेदेखील याबाबत ट्विटरद्वारे दुःख व्यक्त केले. कविताने म्हटले की, एफआयआरमधील आमचे लाडके कमिशनर श्री. सुरेश चटवाल हे आता आपल्यात राहिले नाहीत. ते नेहमीच उत्साही असायचे. ब-याचशा जुन्या फिल्मी गोष्टी ते आम्हाला सांगायचे. त्यांचा आशिर्वाद सदैव माझ्या पाठीशी राहिल.
सुरेश यांनी १९६९ साली ‘राखी राखी’मधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. त्यांनी करण अर्जुन, कोयला, मुन्नाभाई एमबीबीएस यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलेले. २०१० साली प्रदर्शित झालेल्या नक्षत्र या चित्रपटाद्वारे त्यांनी मोठ्या पडद्यावर शेवटची भूमिका साकारली.
संग्रहित लेख, दिनांक 30th May 2016 रोजी प्रकाशित
ज्येष्ठ अभिनेते सुरेश चटवाल यांचे निधन
एफआयआर या मालिकेत काम करणा-या सुरेश यांचे मुंबईत निधन झाले.
Written by लोकसत्ता टीमguravchaitali

First published on: 30-05-2016 at 10:54 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Veteran actor suresh chatwal passes away