मुंबईमधली गेट वे ऑफ इंडिया ही वास्तू तुम्ही बघितली असेल. पण ही भव्य वास्तू उभारायच्या आधी एक सहा फूट उंचीची मिनी गेट वे ऑफ इंडियाची प्रतिकृती बनवण्यात आली होती. रावबहादूर यशवंत देसाई हे त्यावेळचे प्रख्यात इंजिनीअर होते. त्यांच्या देखरेखीखाली ही वास्तू बांधण्यात आली होती. आजही मिनी गेट वे ऑफ इंडिया भेंडी गल्लीतील रावबहादूर देसाईंच्या वास्तूतील गॅरेजमध्ये जतन केलेला आहे… ही कलाकृती दाखवतायत खाकी टूर्सचे भरत गोठोसकर.
संग्रहित लेख, दिनांक 17th Jun 2020 रोजी प्रकाशित
Video : मिनी गेट वे ऑफ इंडिया बघायचाय?
देसाईंच्या वास्तूतील गॅरेजमध्ये जतन केलेला ठेवा
Written by लोकसत्ता ऑनलाइन

First published on: 17-06-2020 at 10:18 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video watch mini gate way of india in mumbai bmh