आयडीबीआयच्या ९०० कोटी रुपयांच्या कर्ज घोटाळ्याप्रकरणी उद्योगपती विजय मल्या यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात यावे, अशी विनंती करणाऱ्या अंमलबजावणी संचालनालयाच्या(ईडी) अर्जावर गैरव्यवहार प्रतिबंधक कायदाअंतर्गत (पीएमएलए) विशेष न्यायालयाने शनिवारी निर्णय सोमवापर्यंत राखून ठेवला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘ईडी’च्या अर्जावर शनिवारी विशेष ‘पीएमएलए’ न्यायालयाचे न्यायाधीश पी. आर. भावके यांच्यासमोर सुनावणी झाली. त्या वेळेस मल्या हे सध्या ब्रिटनमध्ये असल्याचे ‘ईडी’च्या वतीने अ‍ॅड्. हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले. तसेच घोटाळ्याबाबत माहिती देत मल्या यांना अजामीनपात्र वॉरंट का बजावण्यात यावा हेही वेणेगावकर यांनी स्पष्ट केले. मल्या यांनी ‘किंगफिशर एअरलाईन्स’साठी आयडीबीआयकडून ९५० कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. परंतु त्यांनी यापैकी ४३० कोटी रूपयांतून परदेशात मालमत्ता खरेदी केल्याचे चौकशीतून पुढे आले आहे.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vijay mallya takes rs 1 7 cr pay package from us brewery firm
First published on: 18-04-2016 at 01:29 IST