Viral Video on Marathi Language Conflict : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात मराठीवरून वाद सातत्याने उफाळून येत आहे. परप्रांतीयांकडून सतत मराठी भाषेला विरोध केला जातो. या विरोधाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल होत असतात. आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, त्यामध्ये एक मराठी जोडपं पिझ्झा डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीशी मराठीच्या मुद्द्यावरून भांडताना दिसत आहे.
एनडीटीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार भांडूपच्या साई राधे इमारतीत हा प्रकार घडला आहे. रोहित लावरे हा डिलिव्हरी एजन्ट तिथे पिझ्झाची ऑर्डर द्यायला द्यायला गेला होता. या जोडप्याने त्याला मराठीत बोलण्याची विनंती केली. परंतु, त्याने मराठीत बोलण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या जोडप्याने त्याच्यावर मराठी बोलण्याची सक्ती केली. आम्हाला हिंदी बोलता येत नाही, त्यामुळे तू मराठीत बोल असं हे जोडपं सांगू लागलं. पण डिलिव्हरी करणाऱ्या व्यक्तीनेही हिंदी भाषेवर ठाम राहत मराठी बोलणार नाही अशी भूमिका घेतली.
“जबरदस्ती है मराठी बोलने का? पर क्यू?” (मराठी बोलायची जबरदस्ती आहे का? पण का?) असं या डॉमिनॉज पिझ्झाची ऑर्डर घेऊन आलेल्या व्यक्तीने म्हटलं.
“है, यहां पे ऐसा ही है” (हो, इथं असंच आहे), असं प्रत्युत्तर या जोडप्याने दिलं. ‘कौन बोला ऐसे” (कोण बोललं असं?) असा प्रतिप्रश्न डिलिव्हरी बॉयने विचारला. “हिंदी बोलने को नहीं आता तो ऑर्डर नहीं करने का ना. नहीं देना है ना पैसा हां ठीक है.” (पैसे नाही द्यायचेत ना. मग ठीक आहे.), असंही तो म्हणाला.
दरम्यान, हा सर्व प्रकार डिलिव्हरी एजन्टने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यामुळे माझा व्हिडिओ काढू नकोस, असं या महिलेने त्याला बजावलं. तसंच, तिनेही त्याचा व्हिडिओ काढायला सुरुवात केली. तेवढ्यात या महिलेच्या पतीने दरवाजा बंद करण्याचा प्रयत्न केला. ऑर्डर खराब असल्याचंही त्याने म्हटलं.
तेवढ्यात डिलिव्हरी बॉयने म्हटलं की ऑर्डर खराब आहे तर दाखवा. अखेर, पैसे न घेताच हा डिलिव्हरी बॉय माघारी परतल्याचं एनडीटीव्हीने वृत्तात म्हटलं आहे.
When India is at war there is no difference between those protesting for Palestine, crying for Pakistan and harassing Indians over language. All are traitors who have fallen for one Abrahamic idea or another. Picking on a poor Domino pizza delivery guy for not knowing Marathi is… pic.twitter.com/GiQhdKTGpR
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.— Eminent Intellectual (@total_woke_) May 13, 2025
दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सने संताप व्यक्त केला आहे. एकीकडे महाराष्ट्रात मराठीची सक्ती होत असताना फ्रि पिझ्झासाठी असा वाद घालणं योग्य नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या व्यक्तींची रितसर तक्रार करण्यापेक्षा वाद घालण्यात अर्थ नसल्याचंही अनेकांनी म्हटलं आहे.