छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली गाथेवर आधारित आणखी एक ऐतिहासिक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिजीत देशपांडे दिग्दर्शित ‘हर हर महादेव’ हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर २५ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होत असून या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका अभिनेता सुबोध भावे याने साकारली आहे. नुकताच या चित्रपटातील संगीताचा लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.

हेही वाचा >>>Dasara Melava 2022: “शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात ‘हिंगोलीचा डीजे’ वाजणार”, संतोष बांगरांचं सूचक विधान

या संगीत सोहळ्यानंतर ‘हर हर महादेव’ या चित्रपटातील ‘वाह रे शिवा’ या गाण्याची पहिली झलक प्रेक्षकांसमोर आली आहे. ‘झी स्टुडिओज’चे सादरीकरण असलेल्या या चित्रपटातील ‘वाह रे शिवा’ या गाण्याचे गीतकार मंगेश कांगणे असून हितेश मोडक यांनी गाण्याला संगीत दिले आहे. “वैरी उभा बिकट गडी बेभान झेप उडी, समशेर धीट गडी, वाह रे शिवा”, असे या गाण्याचे बोल आहेत. ऐतिहासिक चित्रपट ‘हर हर महादेव’च्या टीझरसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आवाज दिला आहे. “जेव्हा सह्याद्रीला कणा नव्हता आणि मराठीला बाणा नव्हता. ही ३५० वर्षानंतरच्या पहाटफुटीची गोष्ट आहे. ही अठरापगड आरोळ्यांची आणि माझ्या छत्रपतींच्या शिवगर्जनेची गोष्ट आहे ‘हर हर महादेव’…”. राज ठाकरेंच्या आवाजातील या संवादालाही प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

हेही वाचा >>> “शेवटी निवडणूक कोण जिंकणार, हे…” पंकजा मुंडेंच्या मेळाव्यातील आव्हानावर धनंजय मुंडेंची प्रतिक्रिया

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘हर हर महादेव’ हा मराठी चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषेतून प्रदर्शित करण्याचा निर्णय झी स्टुडिओजने घेतला आहे. अभिजीत देशपांडे यांनीच या चित्रपटाच्या लेखन आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. शरद केळकर, अमृता खानविलकर, निशीगंधा वाड, मिलिंद शिंदे, शरद पोंक्षे अशा मातब्बर कलाकारांची फौज या चित्रपटात दिसणार आहे.