पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेटच्या दिशेने येणारी विस्कळीत झालेली वाहतूक पर्ववत झाली आहे. कांदिवली आणि बोरीवली स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाडामुळे गुरूवारी सकाळी चर्चगेटच्या दिशेने येणारी वाहतूक विस्कळीत झाली होती. लोकल गाड्या १० ते १५ मिनिटे उशीराने सुरू होत्या. ऐन गर्दीच्या वेळी लोकल सेवा विस्कळीत झाल्याने चाकरमान्यांना प्रवासात अडचणींचा सामना करावा लागला. त्यानंतर वाहतूक विस्कळीत झाल्याच्या तासाभरानंतर ती पूर्ववत करण्यात रेल्वे प्रशासनाला यश आले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Dec 2015 रोजी प्रकाशित
पश्चिम रेल्वेची लोकल सेवा पूर्ववत
कांदिवली आणि बोरीवली स्थानकादरम्यान तांत्रिक बिघाडीमुळे चर्चगेटच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत
Written by मोरेश्वर येरमविश्वनाथ गरुड
Updated:
First published on: 17-12-2015 at 08:44 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Western line locals running late