मुंबई: लोकशाहीत सनदशीर मार्गाने आंदोलन करण्यास परवानगी मिळत नसेल तर कितीही किंमत मोजावी लागली तरी आम्ही दडपशाहीच्या विरोधात लढत राहणार, असा निर्धार राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर ४० आमदारांनी शिवसेनेतून फुटून भाजपबरोबर सरकार स्थापन केले. या घटनेस एक वर्ष होत आहे. यामुळे शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी गद्दार दिवस पाळताना राज्यात ठिकठिकाणी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीनेही मुंबईत आंदोलन करण्याचा प्रयत्न सुरू असताना पोलिसांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची धरपकड केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही गद्दार दिवस साजरा करत आहोत. यासाठी आम्हाला तुरुंगात टाकणार असाल तर खुशाल टाका. आम्ही जायला तयार आहोत. जे गद्दार आहेत, त्यांना गद्दार म्हणण्याची ताकद माझ्यात आहे, असे सुळे म्हणाल्या.