लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : मुलुंड येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या २२ व्या मजल्यावरून पडून शुक्रवारी एका कामगाराचा मृत्यू झाला. सेफ्टी बेल्ट तुटल्यामुळे तो खाली कोसळल्याचे सूत्रांनी सांगितले. मुलुंड पोलिसांनी याप्रकरणी अपमृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

आणखी वाचा-मुंबई : कामा रुग्णालयातील बंद रेडिओथेरपी केंद्र लवकरच सुरू होणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मोहम्मद वसीम (२२) असे या कामगाराचे नाव असून तो मूळचा बिहारमधील रहिवासी आहे. गेल्या काही दिवसांपासून तो मुलुंडमधील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत सहकाऱ्यांसोबत काम करीत होता. शनिवारी नेहमीप्रमाणे तो आणि त्याचे सहकारी २२ व्या मजल्यावर काम करीत होते. यावेळी अचानक त्याने लावलेला सेफ्टी बेल्ट तुटला आणि तो २२ व्या मजक्यावरून खाली कोसळला. त्याच्या सहकाऱ्यांनी तत्काळ त्याला मुलुंडमधील महानगरपालिका रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी जाहीर केले. घटनेची माहिती मिळताच मुलुंड पोलिसांनी तत्काळ मृतदेह ताब्यात घेऊन अपमृत्यूची नोंद केली.