WAVES 2025 In Mumbai: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज (१ मे) मुंबईत पहिल्या जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचं अर्थात वेव्हज् परिषदेचं उद्घाटन पार पडलं आहे. हा चार दिवसांचा कार्यक्रम मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे होत आहे. या चार दिवसांच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून ‘कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज’ या घोषवाक्याखाली चार दिवसीय शिखर परिषदेत भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवप्रवर्तनाचे जागतिक केंद्र म्हणून प्रदर्शित करण्यात येईल.

भारताच्या पहिल्या ‘जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन’ (वेव्हज्) शिखर परिषदेचं यजमानपद महाराष्ट्र शासनाने भूषवलं आहे. दरम्यान, ‘वेव्हज् २०२५ परिषदेत जगभरातून जवळपास ९० पेक्षा जास्त देश सहभागी झाले आहेत. मनोरंजन क्षेत्रात या वेव्हज् शिखर परिषदेला महत्वाचं मानलं जातं.

व्हेवज् परिषदेसाठी एक लाखांहून अधिक नोंदणी झाली असून वेव्हज् २०२५ परिषदेमध्ये ९० पेक्षा अधिक देश, १०००० प्रतिनिधी, १००० कलाकार, ३०० हून अधिक कंपन्या आणि ३५० हून अधिक स्टार्टअप्स सहभागी झाल्याचं सांगितलं जातं. या परिषदेत ४२ मुख्य सत्रे, ३९ विशेष सत्रे आणि ३२ मास्टर क्लासेस आयोजित करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये ब्रॉडकास्टिंग, इन्फोटेन्मेंट, एव्हीजीसी-एक्सआर चित्रपट आणि डिजिटल मीडिया या सारख्या विविध क्षेत्रांचा समावेश असणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, व्हेवज् परिषदेची कल्पना एक प्रकारचं चांगलं व्यासपीठ म्हणून करण्यात आली आहे. ही परिषद भारताच्या जागतिक मीडिया क्षेत्रातील सहभागात एक ऐतिहासिक टप्पा ठरेल. या परिषदेत पंतप्रधान मोदी ‘क्रिप्टोस्पियर’ला भेट देऊन ‘क्रिएट इन इंडिया’ उपक्रमांतर्गत निवड झालेल्या सर्जनशील कलाकारांशी संवाद साधणार आहेत. या बरोबरच ते भारत पॅव्हिलियन, महाराष्ट्र पॅव्हेलियनला देखील भेट देणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.