लोकसत्ता खास प्रतिनिधी

मुंबई : वांद्रे रिक्लेमेशन परिसरात फिरण्यासाठी आलेल्या तरुणीचा पाठलाग करून त्याचे चित्रण समाज माध्यमांवर वायरल करण्याची धमकी देणाऱ्या ३४ वर्षीय आरोपीला पोलिसांनी रविवारी अटक केली. आरोपीने यावेळी पोलिसांनाही मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात विनयभंग व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बाबर रेहमत खान (३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो नवी मुंबईतील रहिवासी आहे. आरोपी खासगी सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो. २६ वर्षांची पीडित मुलगी तिच्या मैत्रिणीसोबत वांद्रे येथील रिक्लेमेशन परिसरात फिरण्यासाठी आली होती. यावेळी आरोपीने तिचा पाठलाग करून शिवीगाळ केली. तसेच आरोपी पाठलाग करत असताना त्याने बनवलेला व्हिडिओ समाज माध्यमांवर वायरल करण्याची धमकी दिली. पीडित मुलीच्या तक्रानंतर याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी आरोपी खानला ताब्यात घेतले व वांद्रे पोलीस ठाण्यात आणले. तेथेही आरोपीने पोलिसांना शिवीगाळ करण्यास व आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा-वरळी येथील हिट अँण्ड रन प्रकरण : मिहीर शहा आणि त्याच्या चालकाची अटक कायदेशीरच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी आरोपीने पोलीस शिपाई गोराडे यांना मारहाण केली. तसेच, दुसऱ्या पोलिसाचा गणवेश फाडला. याप्रकरणी पोलिसांनी तत्काळ विनयभंग व सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक केली आहे.