मुंबई : परदेशात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून जोगेश्वरी येथील एका तरुणाची १२ लाखांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी एका एजंट विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.जोगेश्वरी पूर्व येथे राहणारा तक्रारदार तरूण हा शेअर दलाल म्हणून काम करतो. त्याला परदेशात नोकरी करण्याची इच्छा होती. त्याचे काका विमानाचे तिकिट काढणारे एजंट म्हणून काम करतात. त्यांनी तक्रारदाराला दिल्लीत राहणाऱ्या अली इस्तियाक अहमद या एजंटचा संपर्क क्रमांक दिला.

जुलै २०२४ मध्ये एजंट अली अहमद हा जोगेश्वऱी येथील एका हॉटेलमध्ये तरूणाला भेटला. त्याने अमेरिकेतील अटलांटा शहरातील एका हॉटेलमध्ये पर्यवेक्षकाची (सुपरवायझर) जागा असल्याचे सांगितले. तेथे नोकरी लावण्यासाठी १० लाख रुपये तसेच व्हिसा आणि तिकिटासाठी मिळून एकूण १२ लाखांचा खर्च येईल असे सांगितले. त्यासाठी अमेय तयार झाला. तिकिट आणि व्हिसा प्रक्रियेसाठी सव्वा लाखांची मागणी केली. ते पैसे तरूणाने आपल्या खात्यातून त्याला पाठवले. काही दिवसात अली अहमदने २९ ऑगस्ट २०२४ रोजीचे इथियोपियन एअर लाईन्सचे मुंबई ते ॲटलांटा असे विमान तिकिट आणि व्हिजा व्हॉटसअपवर पाठवला. त्यामुळे त्याचा विश्वास बसला आणि त्याने पुढील १० लाख रुपये त्याला टप्प्या टप्प्याने पाठवले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अमेरिकेतील ॲटलांटा शहरातील हॉटेलात काम करण्यासाठी नियुक्ती पत्र, करारनामा आदींची आवश्यकता होती. प्रवासाचा दिवस जवळ येते होता. तरूण एजंटकडे सतत या कागपत्रांची मागणी करत होता. मात्र अली अहमद टाळाटाळ करत होता. त्यामुळे २९ ऑगस्ट रोजी तरूणाला परदेशात जाता आले नाही. अली अहमद याने आपला फोन बंद केला. या सर्व प्रकरणात फसवणूक झाल्याचे तरूणाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी जोगेश्वरी पोलीस ठाण्यात तक्रारी दिली. अली अहमद याने बनवाट व्हिसा, तिकिट तयार केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार पोलिसांनी अली अहमद याच्या विरोधात ३३६ (२), ३३६ (३). ३४०(२) आणि ३१८(४) या कलमाअन्वये गुन्हे दाखल केले आहेत.