मुंबई : मृत्युपूर्वी चित्रफित तयार करून २२ वर्षीय तरूणाने गुरुवारी आत्महत्या केल्याची घटना मालाड परिसरात घडली. याप्रकरणी चित्रफितीच्या आधारे मुंबई पोलिसांनी गुरुवारी केबल व इंटरनेट सुविधा पुरवणाऱ्या कंपनतील तीन कार्यकारी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला.

मालाड पूर्व परिसरातील शिवाजी नगरमध्ये वास्तव्यास असलेला चंद्रशेखर तिवारी मोबाइल सेवा पुरविणाऱ्या कंपनीच्या कांदिवली शाखेत कार्यरत होता. तिवारीने स्वतःच्या घरी चादरीने गळफास घेऊन आत्महत्या केली.

हेही वाचा >>> फटाके फोडण्यावरून झालेल्या वादातून ॲन्टॉप हिल येथे तरूणाची हत्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तत्पूर्वी त्याने एक चित्रफित तयार केली आणि ती इन्स्टाग्रामवर अपलोड केली. या ५९ सेकंदाच्या चित्रफितीच्या आधारे चंद्रशेखरचा भाऊ पवन तिवारी याने कुरार पोलिसांकडे तक्रार केली. त्याच्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी दीपक विश्वकर्मा, सदानंद कदम आणि परेश शेट्टी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०८ (आत्महत्येस प्रवृत्त करणे), ३ (५) (सामान्य हेतू), आणि ३५१ (२) (धमकी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.तक्रारीत नमुद तिघे आणि प्रतिस्पर्धी कंपनीकडून चंद्रशेखरला सतत त्रास देण्यात येत होता. परंतु कंपनीने कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप पवनने तक्रारीत केला आहे.