घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त शनिवारी १४ एप्रिल रोजी शहरात विविध शैक्षणिक, सामाजिक, राजकीय संस्था, संघटनांकडून कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने सकाळी १०.३० वाजता औरंगाबाद येथील ज्येष्ठ पत्रकार नौशाद उस्मान यांचे व्याख्यान आयोजित केले आहे. ‘डॉ. आंबेडकरांचे अल्पसंख्याक व धर्मनिरपेक्षतेसंबंधीचे विचार’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयात पूर्वसंध्येला गीतसंध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला. दीक्षाभूमीवर विविध संघटना आणि रिपब्लिकन विचारधारेशी संबंधितांकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती संयुक्तरित्या साजरी करण्यात येते. या श्रुंखलेचा भाग म्हणून १४ आणि १५ एप्रिलला संयुक्त नागरी जयंती आयोजित करण्यात आली आहे. सायंकाळी ५ वाजता प्रबोधनाचा कार्यक्रम होईल. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून काम करणाऱ्या महिलांच्या मुलांसाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘सोबतीण संगोपन केंद्र’ या उपक्रमाचे उद्घाटन सकाळी १० वाजता, विश्वकर्मानगरमध्ये आयोजित करण्यात आले आहे. प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला मदर टेरेसा कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापक प्रतिभा मेश्राम उपस्थित राहणार आहेत.अध्यक्षस्थानी केंद्र प्रमुख रूपाली लोणारे असतील. शिवाय याच भागातील तथागत बुद्ध विहारात जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

3000 Women in Akola, Read Constitution s Preamble, 75 thousand times, Amrit Jubilee Year, 75 year of indian constition, akola news, indian constitution news, indian constitution reading, 3000 Women reading constitution,
अकोला : तीन हजार महिलांकडून ७५ हजार वेळा संविधान प्रस्तावनेचे वाचन
solapur dr babasaheb ambedkar jayanti 2024
डॉ. आंबेडकर जयंतीचा सोलापुरात अखंड उत्साह
Traffic changes in Collectorate area on the occasion of Dr Ambedkar Jayanti
पुणे : डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात वाहतूक बदल… जाणून घ्या पर्यायी मार्ग
Babasaheb Ambedkar Research and Training Institute
बार्टीचे अधिकारी निघाले लंडनला! ग्लोबल भीमजयंतीच्या नावाखाली वंचित विद्यार्थ्यांच्या पैशाचा…

दरवर्षीप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर दौड, नागपूर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेच्या सहकार्याने आयोजित करण्यात आली आहे. सकाळी ७ वाजता पुरुषांच्या १० किलोमीटर आणि महिलांच्या पाच किलोमीटर अंतराच्या स्पर्धेस प्रारंभ होईल. या स्पर्धेत १६ वर्षे वयोगटातील मुले-मुली सहभागी होऊ शकतील. यासाठी स्पर्धेचे सहआयोजक योगेश ठाकरे किंवा नागपूर जिल्हा अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे रामचंद्र वाणी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

भारतीय बौद्ध महासभेच्या पाचगाव शाखेच्यावतीने व्याख्यान आणि पाळणागीते आयोजित करण्यात येणार आहेत. संयोजक सरपंच पुण्यशीला मेश्राम, उपाध्यक्ष शुभांगी दमके आणि सचिव विजू गायकवाड कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. सावनेर नगरपरिषदेतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताह कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून उद्या, १४ एप्रिलला सप्ताहाचा समारोप होणार आहे. कवी सुधाकर गायधनी सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा समारोपीय कार्यक्रमात सत्कार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चालना मिळावी व भगवान बुद्ध व बौधिसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्राचे रेखाटन व्हावे म्हणून दीक्षाभूमीवरील डॉ. आंबेडकर कॉलेज ऑफ मेनेजमेंट रिसर्च सेंटर येथे सकाळी ८ ते ११ वाजेपर्यंत विशेष चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष देवीदास घोडेस्वार, शिक्षणाधिकारी दीपेंद्र लोखंडे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. विदर्भ राज्य आघाडी प्रणित विधि आघाडीच्यावतीने ‘लोकशाही टिकवण्यासाठी आवश्यक अटी व शर्ती’या विषयावर डॉ. जे.व्ही. गवई यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. धंतोली येथील गणेश चेंबर्समधील लोकनायक बापुजी अणे सभागृहात दुपारी चार वाजता व्याख्यानाला सुरुवात होईल.

लोकजन शक्ती पार्टी, भारतीय दलित पँथर, भारीप बहुजन महासंघ, बहुजन रिपब्लिकन एकता मंच, आंबेडकर स्टुडंट फ्रंट, पिपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर) आदींच्यावतीने उद्या, संविधान चौकात बाबासाहेबांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात येणार आहे. पूर्व नागपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक आयोजित करण्यात येते.

विविध विषयांवर परिसंवाद

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समितीच्यावतीने शनिवारपासून दोन दिवस विविध कार्यक्रम आयोजित केले आहे. दीक्षाभूमीवर पहिल्या दिवशी ‘रोल ऑफ बाबासाहेब आंबेडकर  इन द फॉरमेशन ऑफ इगलीटरियन सोसायटी ’ या विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. यात बडोद्यातील सयाजीराव विद्यापीठाच्या कुलगुरू  राजमाता शुभांगिनी गायकवाड प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील. ज्येष्ठ पत्रकार उर्मिलेश (दिल्ली), गगाधर बनबारे (पुणे) अ‍ॅड. रवींदरसिंह गोहात्रा (बडोदा), अन्वर सिद्दकी (नागपूर), व विलास शेंडे प्रमुख वक्ते म्हणून सहभागी होतील. भदंत विमलकीर्ती गुनासरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. १५ तारखेला दुपारी १  वाजता  ‘फ्युचर ऑफ इंडियन युथ’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून सायंकाळी ६ वा. ‘रोल ऑफ वुमेन इन द क्रियेशन ऑफ न्यू नेशन’ या विषयांवर महिलांचा परिसंवाद होईल. यात डॉ. इंदू चौधरी (आग्रा) डॉ.रजीया पटेल (पुणे), जीजा राठोड (जळगाव) आणि सरोज आगलावे (नागपूर) आदी सहभागी होतील.

डॉ. मुणगेकर यांचे उद्या भाषण 

एसबीआय एस्सी/एसटी/बीसी एम्प्लॉईज वेलफेअर असोसिएशन मुंबई सर्कलच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७व्या      जयंतीनिमित्त किंग्जवे वरील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयात रविवार, १५ एप्रिलला सकाळी ११ वाजता जयंती उत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून  नियोजन आयोगाचे माजी सदस्य डॉ. भालचंद्र मुणगेकर उपस्थित राहतील. एसबीआय एस्सी/एसटी/बीसी एम्प्लॉईज वेल्पेअर असोसिएशनचे अध्यक्ष अनंत कोळी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमाला असोसिएशनचे सरचिटणीस अनिल गमरे, एसबीआय मुख्य विभागाचे उपमहाव्यवस्थापक एम.व्ही.आर. रवि कुमार, मुख्य विभाग दोनचे उपमहाव्यवस्थापक रजत बॅनर्जी, एसबीआय, आयएफबी शाखेचे उपमहाव्यवस्थापक सुनील झोडे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तसेच प्रादेशिक व्यवस्थापक रवींद्र पाटील, अरुणा कुमार मोकराला, उदय पानसे, प्रकाश बरोड, नागपूर मुख्य शाखेचे सहाय्यक महाव्यवस्थापक मोहन चांगदे, सहाय्यक महाव्यवस्थापक अक्षय तिवारी, सहाय्यक महाव्यवस्थापक अनिल कुमार उपस्थित राहतील.