News Flash

कारखाली चिरडून गुंडाच्या खुनाचा प्रयत्न

याप्रकरणी सदर पोलिसांनी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली0

नागपूर :  पैशाच्या वादातून चौघांनी एका गुंडाला कारखाली चिरडून त्याचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एसएफएस शाळेसमोर घडली. जुगनू ज्ञानेश्वर वानखेडे (३०) रा. संजय गांधीनगर, असे जखमीचे नाव आहे.

याप्रकरणी सदर पोलिसांनी ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली0. निखिल आटोडे (३५) रा. सुभेदारनगर, संकेत पोरंडवार (२५) रा. बिडीपेठ, रोशन राऊत (२६) रा. सुभेदारनगर व बॉबी (२७), अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. जुगनू हा गुन्हेगार आहे.

त्याच्याविरुद्ध विनयभंग, जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. रोशन याचे किराणा दुकान आहे. जुगनू याने रोशन याच्या सासूकडून ५० हजार रुपये उधार घेतले. त्याने ३० हजार रुपये परत केले.

२० हजार रुपये देण्यास तो टाळाटाळ करायला लागला. रोशनने त्याला पैशाची मागणी केली. जुगनूने त्याला ठार मारण्याची धमकी दिली. बुधवारी रात्री जुगनू हा एमएच-४९, बीपी-४२५७ क्रमांकाच्या मोपेडने मित्र राहुल शेंगळे याला जरीपटका भागात भेटायला जात असल्याची माहिती रोशनला मिळाली.

रोशन व त्याच्या तीन साथीदारांनी एमएच-३१, एस-०३२२ या क्रमांकाच्या कारने त्याचा पाठलाग सुरू केला. एसएफएस शाळेसमोर कारने मोपेडला धडक दिली. जुगनू जखमी झाला.

जुगनूचा मृत्यू झाल्याचे समजून चौघेही पसार झाले. घटनेची माहिती मिळताच सदर पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी जुगनूला रुग्णालयात दाखल केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2021 2:24 am

Web Title: attempted to murder of a gangster in nagpur zws 70
Next Stories
1 एका त्यागकथेची उलट-सुलट चर्चा 
2 Coronavirus in nagpur : मृत्यू घटले, रुग्ण वाढले!
3 टाळेबंदीमुळे भूखंड निविदेस मुदतवाढ
Just Now!
X