• समता परिषदेचा आरोप ल्ल संविधान चौकात आंदोलन

नागपूर : ओबीसींची जातनिहाय जनगणना करणार नाही, ओबीसींचा इम्पिरिकल टेडा देणार नाही आणि ओबीसी विद्यार्थ्यांना ऑल इंडिया मेडिकल कोटय़ातून प्रवेश देणार नाही, अशी ओबीसी विरोधी भूमिका  मोदी सरकारने घेतल्याने महात्मा फुले समता परिषदेने बुधवारी संविधान चौकात आंदोलन  केले.  हे सरकार ओबीसी जनगणनेचे मारेकरी आहेत. आम्ही त्याचा निषेध करतो, असे महात्मा फुले समता परिषदेचे विभागीय अध्यक्ष प्रा. दिवाकर गमे म्हणाले.

यानंतर आंदोलकांनी विभागीय आयुक्त यांना निवेदन दिले आणि जातनिहाय जनगणना करण्याची मागणी केली. आंदोलनात नागपूर जिल्हा संघटक मनोज गणोरकर, महिला अध्यक्ष विद्या बहेकर, महानगर अध्यक्ष आरिफ काझी, महानगर संघटक मिलिंद पाचपोर, महानगर अध्यक्ष निशा मुंडे, रेखा कृपाले, भंडारा महिला अध्यक्ष अ‍ॅड. साधना येळणे, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष प्रा. जगदीश जुनगरी, गडचिरोली कार्याध्यक्ष रामचंद्र वाढई, भंडारा जिल्हाध्यक्ष राहुल निर्वाण, गोंदिया कार्याध्यक्ष विष्णु नागरीकर, वर्धा जिल्हाध्यक्ष निळकंठ पिसे, कविता मुंगळे, मीना भैसारे, मुमताज बेगम, माया गणोरकर, लक्ष्मी सावरकर अर्चना भगत सहभागी झाल्या होत्या.