News Flash

करोना बळींची संख्या पुन्हा शंभरीपार!

पाटणसावंगी येथील एक ५३ वर्षीय अत्यवस्थ संवर्गातील करोनाग्रस्त पुरुष रुग्णावर मेयोत उपचार सुरू होते.

२४ तासांत ७,३४४ नवीन रुग्णांची भर

नागपूर : जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या मृत्यूचे तांडव शमण्याचे नाव घेत नाही. गेल्या २४ तासांत जिल्ह्यात आणखी ११०  रुग्णांचा मृत्यू झाला तर ७ हजार ३४४ नवीन रुग्णांची भर पडली.

शहरात दिवसभरात ५८, ग्रामीण ४५, जिल्ह्याबाहेरील ७ असे एकूण ११० रुग्णांचे मृत्यू झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या मृत्यूची संख्या ४ हजार १०८, ग्रामीण १ हजार ५९४, जिल्ह्याबाहेरील ९८३ अशी एकूण ६ हजार ६८५ रुग्णांवर पोहोचली आहे.

दिवसभरात शहरात ४ हजार ६१९, ग्रामीण २ हजार ७१८, जिल्ह्याबाहेरील ७ असे एकूण ७ हजार ३४४ नवीन करोनाग्रस्त रुग्ण आढळले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनाग्रस्तांची संख्या २ लाख ५९ हजार १२०, ग्रामीण ९० हजार ६४८, जिल्ह्याबाहेरील १ हजार १६५ अशी एकूण ३ लाख ५० हजार ९३३ रुग्णांवर पोहोचली आहे.

शहरात दिवसभऱ्यात १६ हजार २७६, ग्रामीण ५ हजार ३०९ अशा एकूण २१ हजार ५८५  चाचण्या झाल्या. २१ एप्रिलला झालेल्या २४ हजार १६३ नमुन्यांहून ही संख्या कमी आहे, हे विशेष.

संपूर्ण लसीकरण एकूण – ४,४२,२०१

खाटांची उपलब्धता

शहरातील खाजगी व शासकीय रुग्णालये मिळून बाधितांसाठी किती खाटा (बेड्स) उपलब्ध आहे याची माहिती  www.nmcnagpur.gov.in व   http://nsscdcl.org/covidbeds वर  तसेच हेल्पलाईन  ०७१२-२५६७०२१ आणि २५५१८६६ यावर संपर्क साधल्यास उपलब्ध आई.सी.यू. प्राणवायू, व्हेंटिलेटर, खाटांची माहिती प्राप्त होईल. गुरुवारी रात्री ९ वाजेपर्यंत प्राणवायू खाटा  ५ आणि प्राणवायू नसलेल्या खाटा  १२ उपलब्ध होत्या.

मेयोतील करोनाग्रस्त बेपत्ता

पाटणसावंगी येथील एक ५३ वर्षीय अत्यवस्थ संवर्गातील करोनाग्रस्त पुरुष रुग्णावर मेयोत उपचार सुरू होते. त्याला प्राणवायूही लागले होते. त्याचे नातेवाईक २१ एप्रिलला रुग्णालयात  डबा घेऊन पोहचले. परंतु रुग्ण बेपत्ता असल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आल्याने नातेवाईक स्तब्ध झाले. तातडीने

शोध सुरू झाला. परंतु  माहिती मिळाली नाही. या विषयावर मेयो प्रशासनाशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, होऊ  शकला नाही.

सक्रिय रुग्णांची संख्या ७२ हजार पार

शहरात ४४ हजार ४६७, ग्रामीण २८ हजार १० असे एकूण ७२ हजार ४७७ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील गंभीर संवर्गातील ८ हजार ७१२ रुग्णांवर विविध कोविड रुग्णालय, कोविड केअर सेंटरमध्ये  तर ६३ हजार ७६५ रुग्ण गृह विलगीकरणात उपचार सुरू आहेत. दरम्यान, शहरातील रुग्णालयांत खाट उपलब्ध होत नसल्याने बरेच गंभीर रुग्ण गृह विलगीकरणात उपचार घेत आहेत. त्यामुळे मृत्यूंची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

विदर्भात करोनाचे २६५ मृत्यू

विदर्भाच्या अकरा जिल्ह्यात करोना मृत्यूची वाढती संख्या चिंता वाढवत आहे. गेल्या २४ तासांत येथे आणखी २६५ करोना रुग्णांचा मृत्यू तर १५ हजार ५९५ नवीन रुग्णांची भर पडली. नागपूर, यवतमाळला सर्वाधिक मृत्यू नोंदवले गेले. नागपूरच्या शहरी भागात दिवसभरात ५८, ग्रामीण ४५, जिल्ह्याबाहेरील ७, असे एकूण ११० रुग्णांचा मृत्यू झाला.  येथे २४ तासांत ७ हजार ३४४ नवीन रुग्णांची भर पडली. भंडाऱ्यात १४ रुग्णांचा मृत्यू तर ९४७ रुग्ण, अमरावतीत १६ मृत्यू तर ७३९ नवीन रुग्ण, चंद्रपूरला २८ मृत्यू तर १ हजार ५३७ रुग्ण, गडचिरोलीत १९ मृत्यू तर ४१७ रुग्ण, गोंदियात ११ मृत्यू तर ६६२ रुग्ण, यवतमाळला ३७ मृत्यू तर १ हजार २२० रुग्ण, वाशीमला १ मृत्यू तर ३८७ रुग्ण, अकोल्यात १० मृत्यू तर ७०८ रुग्ण, बुलढाण्यात ३ मृत्यू तर ८७९ रुग्ण, वर्धा जिल्ह्यात १६ मृत्यू तर ७५५ रुग्ण आढळले. विदर्भातील एकूण मृत्यूंमध्ये नागपूर जिल्ह्यातील ४१.५० टक्के मृत्यूंचा समावेश आहे.

करोनामुक्तांचे प्रमाण ७७.४० टक्क्यांवर

शहरात दिवसभरात ३ हजार ८४८, ग्रामीण २ हजार ४६६ असे एकूण ६ हजार ३१४ व्यक्ती करोनामुक्त झाले. त्यामुळे शहरातील आजपर्यंतच्या करोनामुक्तांची संख्या २ लाख १० हजार २५१, ग्रामीण ६१ हजार ५२० अशी एकूण २ लाख ७१ हजार ७७१ व्यक्तींवर पोहोचली आहे.  आजपर्यंत आढळलेल्या बाधितांच्या तुलनेत  करोनामुक्तांचे प्रमाण ७७.४० टक्के आहे.

 

लसीकरण आढावा

पहिली मात्रा

आरोग्य सेवक       – ४२०५६

फ्रंट लाईन वर्कर      – ४०६३७

४५ अधिक  वयोगट    –  ८५१७२

४५ अधिक कोमार्बिड     – ७११०७

६० अधिक सर्व नागरिक – १,५२,४५८

एकूण  –      ३,९१,४३०

दुसरी मात्रा

आरोग्य सेवक           – १७५१०

फ्रंट लाईन वर्कर       –  १०२०८

४५ अधिक वयोगट      – ३३६२

४५ अधिक कोमार्बिड    –  ४०८९

६० अधिक सर्व नागरिक   –  १२५६०२

एकूण – ५०७७१

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 12:07 am

Web Title: corona virus infection corona virus death in nagpur akp 94
टॅग : Corona
Next Stories
1 साहेब, माझा पर्यायी डॉक्टर मिळेल पण माझ्या मुलांना आई कुठून देणार?
2 ‘त्या’ वाघाच्या नशिबी कायमचे अपंगत्व!
3 करोना चाचणी अहवालाला सुमारे चार दिवसांची प्रतीक्षा!
Just Now!
X