नागपूर सुधार प्रन्यासला १५ डिसेंबरला मिळणार

नागपूर महानगर क्षेत्राचा (मेट्रो रिजन) विकास करताना सध्या अस्तित्वात असलेल्या बांधकामांचे उपग्रहाद्वारे प्रतिमा घेऊन त्याचे मानचित्र तयार करण्याचे काम करण्यात येत आहे. मेट्रो रिजनचे ‘बेस मॅप’ काम अंतिम टप्प्यात असून १५ डिसेंबपर्यंत तयार केले जाणार आहे.

BMC Recruitment 2024
बृहन्मुंबई महानगरपालिकेत ‘या’ पदासाठी निघाली मोठी भरती! ९० हजारपर्यंत मिळू शकतो पगार
Wrist ticket, Metro 1, Mumbai,
मुंबई : ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी मनगटी तिकिटाचा पर्याय, एमएमओपीएलकडून नवीन तिकीट सेवा कार्यान्वित
Change in train schedule due to night block at Vikhroli
विक्रोळीतील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल
IPL 2024 Performance of 5 impact players
IPL 2024 : शिवम दुबे ते साई सुदर्शनपर्यंत ‘या’ ५ ‘इम्पॅक्ट प्लेयर्स’नी पहिल्या १० दिवसात गाजवलं मैदान

जिल्ह्य़ात नागपूर महापालिकेच्या हद्दीपासून २५ किलोमीटपर्यंत मेट्रो रिजन विकसित केले जाणार आहे. नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळाने नागपूर महानगर क्षेत्र विकास आराखडा मंजूर करून राज्य सरकारकडे दोन महिन्यापूर्वी सादर केला आहे.

राज्य सरकार त्याला अंतिम मंजुरी देणार आहे. त्यापूर्वी नागपूर सुधार प्रन्यासने मेट्रो रिजनच्या परिसराचे सॅटेलाईट मॅपिंग सुरू केली आहे. त्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासने नागपुरातील महाराष्ट्र रिमोट सेंसिंग अप्लिकेशन सेंटर यांच्याशी सामंजस्य करार केला आहे. त्यांचे काम देखील सुरू झाले असून मेट्रो रिजनचा प्राथमिक नकाशाचे काम १५ डिसेंबपर्यंत पूर्ण होणार आहे.

मेट्रो रिजनचा विकास आराखडा तयार करण्यासाठी नागपूर सुधार प्रन्यासला नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. नागपूर मेट्रो रिजनची योजना येऊन १७ वर्षे झाली. या काळात मेट्रो रिजनच्या परिसरात अनेक ठिकाणी बांधकामे झाली. बऱ्याच ठिकाणी लेआऊट टाकण्यात आले आहेत. यामुळे मेट्रो रिजनचे जीआयएस मॅपिंग केले जात आहे. या पद्धतीमुळे लहानातल्या लहान बांधकामाची माहिती घेतली जाते. त्यामुळे नियोजन करताना मदत होते. बरेचदा बांधकाम असलेल्या जागेवर आरक्षण टाकले जाते. त्यानंतर ते आरक्षण वगळण्याची नामुष्की ओढवते, असा आजवरचा अनुभव नागपूरकरांना आहे.

मेट्रो रिजनमध्ये १०. लाख लोकसंख्या

सादर आराखडा नागपूर मेट्रो रिजनमध्ये २०३२ पर्यंत आवश्यक पायाभूत सुविधा आणि आवश्यक जमिनीचा विचार करण्यात आला. आराखडय़ात २०११ ची जनगणना गृहीत धरून मेट्रो रिजनमध्ये सुमारे १०.३ लाख लोकसंख्या अपेक्षित धरण्यात आली आहे. ५८ टक्के मनुष्यबळ कृषीक्षेत्रातील आहे.

खर्च ३७ हजार कोटी

नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्त मंडळाने नागपूर महानगर क्षेत्र विकास आराखडा मंजूर करून राज्य सरकारकडे सादर करण्यात आला आहे. मेट्रो रिजनमध्ये पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी ३७ हजार कोटी रुपयांचा अंदाजित खर्च आहे. मेट्रो रिजनचे क्षेत्रफळ ३,५६७ चौ. किलोमीटर आहे. यामध्ये ९ तालुक्यातील ७२१ गावांचा समावेश आहे. गेल्या वर्षांत महापालिका हद्दीच्या बाहेर मोठय़ा प्रमाणात नगर विकसित झाले आहे. त्यामुळे नियोजबद्ध विकास करण्यासाठी मेट्रो रिजन विकसित केले जात आहे. महापालिका हद्दीपासून २५ किलोमीटरच्या परिसरात महानगर क्षेत्र विकसित होत आहे.

दुसऱ्या टप्प्यात जलवाहिन्या, रस्त्यांचे मानचित्र

मेट्रो रिजनची जीआयएस मॅपिंग करण्यात येत आहे. यामुळे मेट्रो रिजनचा विकास करण्यास मदत होणार आहे. यासाठी महाराष्ट्र रिमोट सेंसिंग अप्लिकेशन्स सेंटर (एमआरएसएसी)ची मदत घेण्यात आली आहे. सॅटेलाईट इमेजद्वारे मेट्रो रिजनचा सविस्तर नकाशा काढण्यात येत आहे. १५ डिसेंबपर्यंत मेट्रो रिजनचा ‘बेस मॅप’ तयार होणार आहे. त्यानंतर जलवाहिन्या, रस्ते याचे मानचित्र तयार केले जाईल.