भारतीय रेल्वेतील नॅरोगेजचा ऐतिहासिक वारसा सांगणारा नागपुरातील नॅरोगेज रेल्वे संग्रहालयानंतर आणखी असेच देशातील दुसरे संग्रहालय मध्यप्रदेशातील नैनपूर येथे उभारण्यात येणार आहे. त्यासाठी प्रस्ताव अंतिम टप्प्यात असून पुढील वर्षी मार्चअखेर संग्रहालय जनतेसाठी खुले करण्याचा मानस रेल्वेचा आहे.

ब्रिटिशांनी मध्य भारतात सातपुडा रेल्वे म्हणून रेल्वेचे जाळे विणले. त्या मार्गावर कित्येक वर्षे स्वतंत्र भारतातही प्रवास सुरू होता. त्याचे आता ब्रॉडगेजमध्ये रूपांतर करणे सुरू आहे. हे रेल्वेमार्ग १९०३ ते १९०९ या कालावधीत सुरू झाले. मध्य भारतात ब्रिटिशांच्या काळात सुरू केलेल्या या नॅरोगेज रेल्वेची इत्यंभूत माहिती देणारे संग्रहालय नागपुरातील मोतीबाग परिसरात आहे.

Narayan Rane, Vinayak Raut,
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये ‘कडवट’ माजी-आजी शिवसैनिकांमध्ये लढत
Indian Railway completes 171 years Boribandar to Thane local ran on 16 April 1853
भारतीय रेल्वेला १७१ वर्षे पूर्ण! १६ एप्रिल १८५३ रोजी धावली बोरीबंदर ते ठाणे लोकल
On the occasion of Prime Minister Narendra Modi visit to Kanhan Nagpur police force on high alert mode Nagpur
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा: नागपूर पोलीस ‘हाय अलर्ट मोड’वर; वाहतुक बदल जाणून घ्या…
Thane Division, Devendra Fadnavis
ठाणे विभाग भाजपासाठी महत्त्वाचा, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सुचक विधान

तत्कालीन रेल्वेमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन १४ डिसेंबर २००२ ला झाले होते. येथे मोठय़ा प्रमाणात जुन्या आणि पुरातन काळातील भारतीय रेल्वेच्या वस्तू आहेत. आता मध्यप्रदेशातील नैनपूर येथे असेच संग्रहालय उभारण्यात येणार आहे.

एकेकाळी नैनपूर नॅरोगेज रेल्वे मोठे जंक्शन होते. येथून जबलपूर, छिंदवाडा, बालाघाट आणि गोंदिया, अशा चारही दिशांनी रेल्वेमार्ग आहेत. येथे विभागीय अधीक्षक (आता विभागीय व्यवस्थापक) कार्यालय होते. गोंदिया-नैनपूर मार्गावर पहिल्यांदा १९०३ ला गाडी धावली. हा रोमांचकारी इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि रेल्वेचा वारसा सुरक्षित ठेवण्यासाठी येथे संग्रहालय उभारण्यात येत असल्याचे रेल्वे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे, या संग्रहालयाचा पर्यटनाच्या दृष्टीनेही विचार होत आहे. पर्यटन केंद्र म्हणून या संग्रहालयाचा विकास झाल्यास त्याचा दुहेरी लाभ रेल्वेला मिळेल.

येथून कान्हा व्याघ्र प्रकल्प जवळ आहे. पर्यटक मंडला येथून सुमारे ४२ कि.मी.वरील नैनपूरला येऊ शकतील, असा विश्वास रेल्वे अधिकाऱ्यांना वाटत आहे. या भागात २०व्या शतकाच्या प्रारंभी रेल्वेमार्ग टाकण्यात आले.

नैनपूर-छिंदवाडा १९०४ आणि नैनपूर-जबलपूर मार्ग १९०५ आणि नैनपूर-मंडला फोर्ट मार्ग १९०९ ला प्रारंभ झाले. सातपुडा नॅरोगेज रेल्वे नावाने प्रसिद्ध असलेल्या या रेल्वेचे जाळे सुमारे एक हजार कि.मी. आहे. नैनपूर येथे होणाऱ्या संग्रहालयासाठी सुमारे २५ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

नैनपूर हे नॅरोगेज रेल्वे मोठे केंद्र होते. तो आमचा वारसा आहे. त्याला सुरक्षित ठेवण्यासाठी संग्रहालय उभारण्यात येत आहे. जबलपूर-नैनपूर ब्रॉडगेज मार्गावर गाडी सुरू होईपर्यंत संग्रहालयाचे काम पूर्ण करण्यात येईल.

– ए.के. अग्रवाल, विभागीय व्यवस्थापक, दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वे.

 

देशातील रेल्वे संग्रहालय

  • नॅरोगेज रेल्वे संग्रहालय, मोतीबाग, नागपूर</li>
  • राष्ट्रीय रेल्वे संग्रहालय, नवी दिल्ली
  • म्हैसूर रेल्वे संग्रहालय, म्हैसूर
  • जोशींचे मिनीएचर रेल्वे संग्रहालय, पुणे</li>
  • प्रादेशिक रेल्वे संग्रहालय, चेन्नई
  • रेल्वे हेरिटेज सेंटर, तिरुचिरापल्ली
  • घुम रेल्वे संग्रहालय घूम (प.बंगाल)
  • पूर्व रेल्वे संग्रहालय, हावडा
  • कानपूर रेल्वे संग्रहालय, कानपूर