राज्याच्या कामगार खात्याने एक जानेवारी ते जून २०२१ या सहा महिन्यांसाठी कामगारांकरिता किमान वेतनाचे सुधारित दर लागू केले आहेत. मूळ वेतनात विशेष भत्त्याची भर पडणार असल्याने त्याचा फायदा कामगारांना होणार आहे.

राईस मिलमधील कामगारांसाठी किमान वेतन ३८०० ते ४६०० व भत्ता १२३९, रस्ते बांधकाम क्षेत्रासाठी ४७५० ते ४९५० व भत्ता १६२५,वाहतूक क्षेत्रासाठी ४२०० ते ५७०० अधिक भत्ता १२१९, हॉटेल्स व रेस्टॉरन्ट ३०५० ते ३२०० अधिक भत्ता १६१५, प्रिंन्टिंग प्रेस ४४०० ते ४६००  अधिक भत्ता १६५०, कापूस जिनिंग कामगार ४२०० ते ५२००  अधिक भत्ता ९५० असे किमान वेतनाचे दर आहेत. कामगार विभागाच्या संकेतस्थळावर वरील माहिती देण्यात आली आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी नागपूर विभागाचे अप्पर कामगार आयुक्त (प्रभारी) विजय पानबुडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी दूरध्वनी घेतला नाही.

विशेष भत्त्याचा लाभ मिळणार

*  विविध क्षेत्रातील सूचिबद्ध कामगारांसाठी विभागाने राज्याची तीन झोनमध्ये विभागणी केली आहे.

*  झोन-एक मध्ये अ व ब वर्ग महापालिकेचे क्षेत्र, झोन-२ मध्ये क आणि ड वर्ग महापालिका व अ वर्ग नगरपालिकांचे क्षेत्र, तर झोन-तीन मध्ये उर्वरित भागांचा समावेश आहे. झोननिहाय वेगवेगळे दर आहेत.

*  कामगारांचे कुशल (स्कील्ड),अकुशल (अनस्किल्ड),अर्धीकुशल(सेमीस्किल्ड) असे तीन गट तयार करण्यात आले. कामगारांचे वर्गीकरण आणि झोननिहाय किमान वेतनाचे दर वेगवेगळे आहेत.

*  झोन एकमध्ये अकुशल कामगारांना मूळ वेतन (१०,०२१) अधिक विशेष भत्ता (९३६) असे एकूण १०,९५७

*  अर्ध कुशल कामगारांसाठी मूळ वेतन( १०,८५६) अधिक विशेष भत्ता (९३६) मिळून ११,७९२  कुशल कामगारांना मूळ  वेतन (११,६३२) अधिक भत्ता (९३६) असे एकूण १२,५६८ प्रति महिना किमान वेतन निर्धारित केले आहे.

*  झोन दोनमध्ये अकुशल कामगारांना विशेष भत्त्यासह १०,३६१, अर्ध कुशलसाठी ११,९३६ आणि कुशल कामगारांसाठी ११,९७२

*  झोन-३ मधील अकुशल, अर्धकुशल व कुशल कामगारांसाटी अनुक्रमे ९७६४,१०,६०० आणि ११,३७६ रुपये प्रति महिना, असे दर निश्चित करण्यात आले.