नागपूर : जून महिन्याच्या अखेरीस उशिरा दाखल झालेल्या मान्सूनने दमदार आगमन केले, पण गेल्या दोन आठवडय़ापासून हा पाऊस दडी मारून बसला आहे. हवामान अभ्यासकांनी आणखी २० जुलैपर्यंत पाऊस नाही, असा अंदाज दिला आहे. एक जून ते १५ जुलैपर्यंत सरासरी ३४७.५६ टक्के पाऊस पडतो, पण यावर्षी तो २२४.४१ टक्के  पडला आहे.

राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होत असताना विदर्भात मात्र पावसाने पाठ फिरवली आहे. जूनच्या मध्यान्हात भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यात चांगला पाऊस पडला, पण नागपूर जिल्ह्याकडे पावसाने पाठ फिरवली. पावसाचा जोर मंदावत चालल्याने पर्जन्यमानातील तूट वाढत चालली आहे. हवामान अभ्यासकांनीही २० जुलैपर्यंत पाऊस नाही, असा अंदाज वर्तवल्याने जुलैच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवडय़ाकडे लक्ष लागले आहे. १ जून ते ३० सप्टेंबपर्यंत जिल्ह्यात सरासरी ९९४.९५ मिलिमीटर इतका पाऊस पडतो, तर एक जून ते १५ जुलैपर्यंत पडणारा पाऊस ३४७.५६ टक्के इतका आहे. पर्जन्यमानाची ही टक्केवारी ६५ टक्के इतकी आहे. मात्र, यावर्षी एक जून ते १५ जुलैपर्यंत केवळ २२४.४१ मिलिमीटर इतकाच पाऊस पडला. ही तूट ३५ टक्के आहे. नागपूर शहरात पर्जन्यमानातील तूट ४४ टक्के आहे. नागपूर ग्रामीणमध्ये पर्जन्यमानातील तूट ३६ टक्के आहे.

जलसाठय़ाची स्थिती (मध्यम)

’ एकूण प्रकल्प – १३

’ पाणी -(२०१९) – १४.१६ टक्के

’ मागील वर्षी (२०१८) – ४७ टक्के