|| महेश बोकडे

नवीन सात रुग्णांच्या मृत्यूची भर :- ‘डेंग्यू’वर नियंत्रण मिळवण्यात नागपूर महापालिका आणि सार्वजनिक आरोग्य विभाग अपयशी ठरले असून शहर व विदर्भातील रुग्णसंख्या १,१४९ वर पोहचली आहे. आज बुधवारी मृत्यू अंकेक्षणाच्या बैठकीत येथे डेंग्यूच्या नवीन सात मृत्यूंची भर पडली असून एकूण बळींची संख्या दहावर पोहचली आहे. नागपुरात १६ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावरही या आजाराचे सावट पसरले आहे.

infosys profit rs 7969 crore in fourth quarter
इन्फोसिसचा तिमाही नफा ७,९६९ कोटींवर; मार्चअखेर तिमाहीत ३० टक्क्यांची दमदार वाढ
Equity mutual fund inflows eased in March
मार्चमध्ये इक्विटी म्युच्युअल फंडांतील ओघ आटला
LSG Pacer Mayank Yadav
IPL 2024 : मयंक यादवने दिल्लीसाठी नाकारली होती सर्विसेजची ऑफर, ऋषभ पंतच्या कोचच्या मदतीने बनला ‘राजधानी एक्सप्रेस’
The central government fiscal deficit reached Rs 15 lakh crore at the end of February
वित्तीय तूट १५ लाख कोटींवर; फेब्रुवारीअखेर वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत ८६.५ टक्क्यांवर

पुण्यातील आरोग्य विभागाच्या नोंदीनुसार, पूर्व विदर्भात १ जानेवारी ते २८ नोव्हेंबर २०१९ या काळात डेंग्यूचे १ हजार १४९ रुग्ण आढळले होते. त्यातील ७० टक्के रुग्ण हे तीन महिन्यांतील आहेत. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्य़ातील सर्वाधिक ५१६ रुग्ण हे नागपूर शहरातील आहेत. नागपूर  ग्रामीणमध्ये ८४, चंद्रपूर शहरात २४८, चंद्रपूर ग्रामीण  १९८, वर्धा ८४, भंडारा ५७, गोंदिया २९ तर गडचिरोली येथे तब्बल ८ रुग्णांची नोंद झाली. नागपूर शहरात गेल्यावर्षीही पूर्व विदर्भातील सर्वाधिक रुग्ण आढळले होते. तो अनुभव लक्षात घेता निदान यंदा तरी महापालिकेकडून योग्य उपाय होणे अपेक्षित होते. परंतु रुग्णसंख्या बघता आरोग्य विभाग गंभीर दिसत नाही. महापालिकेच्या आरोग्य विभागातील एका अधिकाऱ्याने मात्र नित्याने फवारणी होत असल्याचा दावा केला.  महापालिकेच्या आरोग्य उपसंचालक डॉ. भावना सोनकुसळे यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.  नागपूरच्या आरोग्य उपसंचालक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी मृत्यूसंख्येच्या माहितीला दुजोरा दिला.