प्रमोद खडसे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाशीम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल २५ मे रोजी दुपारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. बारावी परीक्षेसाठी राज्यभरातील १४,१२,१९८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,१६,३७१ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामधून १२,९२,४६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर १,२३,९०३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत.

बारावीचे वर्ष हे विद्यार्थी जीवनातील अत्यंत महत्त्वाचे वर्ष म्हणून गणल्या जाते. अमरावती विभागातील अकोला, बुलडाणा, यवतमाळ, वाशीम आणि अमरावती या पाच जिल्हयातून १,३९,७६९ विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेकरिता नोंदणी केली. त्यापैकी १३८५६४ विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. यामधून १२८५२१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर संपूर्ण विभागातील १००४३ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. निकालानंतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी हताश न होता अधिक जोमाने तयारीला लागावे, यश नक्कीच मिळेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 1 lakh 23 thousand 903 students across the state failed in class 12th examination washim pbk 85 amy
First published on: 26-05-2023 at 13:27 IST