नागपूर : ऊर्जामंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरात महावितरणच्या नागपूर शहर मंडळ आणि संचालन व सुव्यवस्था आणि भरारी पथकाने पाच दिवसांत १०७ वीजचोऱ्या उघडकीस आणल्या. ही कारवाई आणखी तिव्र करणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.

महावितरणच्या चमूने पाच दिवसांत भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५ अन्वये १०७ ग्राहकांकडील सुमारे ३१.६५ लाख रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली. सोबत कलम १२६ अन्वये ५ ग्राहकांकडील सुमारे १.३ लाखांची वीज अनियमितताही पुढे आणली. शहरातील सिव्हिल लाइन्स विभागातील संघर्ष नगर, लश्करीबाग, यशोधरा नगर, महाल विभागातील ताजबाग व हसनबाग, गांधीबाग विभागातील मोमीनपुरा व अन्सार नगर आणि खोग्रेसनगर विभागातील जयताळा, हुडकेश्वर या भागातील वीज हानी अधिक असलेल्या वाहिन्यांवर ४ सप्टेंबरपासून ही मोहीम पोलीस बंदोबस्तात केली जात आहे.

Nagpur became the center point of mahayuti 15 leaders met
नागपूर ठरले महायुतीचे केंद्रबिंदू, १५ नेत्यांनी घेतली भेट
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन
ED claim in court in Delhi liquor scam case that crime is impossible without Sisodian  participation
सिसोदियांच्या सहभागाशिवाय गुन्हा अशक्य! दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी ‘ईडी’चा न्यायालयात दावा
narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यात बदल ?

हेही वाचा – आता एसटी कर्मचाऱ्यांचीही आंदोलनाची हाक, सरकारच्या अडचणीत वाढ, काय आहेत मागण्या जाणून घ्या

हेही वाचा – मराठा आरक्षण : मोताळा येथे आजपासून सहाजणांचे आमरण उपोषण, जरांगेंना पाठींबा तर फडणवीसांच्या राजीनाम्याची मागणी

महावितरणचे प्रादेशिक संचालक सुहार रंगारी आणि मुख्य अभियंते दिलीप दोडके, शहर मंडळाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे यांच्या देखरेखीत ही कारवी राजेश घाटोळे, समीर टेकाडे, राहुल जीवतोडे, हेमराज ढोके यांच्यासह त्यांची चमू करत आहे.