नागपूर : भांडण, कौटुंबिक समस्या, आर्थिक परिस्थिती किंवा शहरातील वलयांकित जीवनाच्या आकर्षणाने घर सोडून पळालेल्या राज्यातील वेगवगेळ्या ठिकाणच्या १६३ मुला-मुलींना रेल्वे सुरक्षा दलाने शोध घेऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या स्वाधीन केले. यामध्ये रेल्वेच्या भुसावळ विभागातील सर्वाधिक ७८ मुलांचा समावेश आहे.

रेल्वे सुरक्षा दलाकडे रेल्वे मालमत्ता, प्रवासी क्षेत्र आणि प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी आहे. त्यांनी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ या उपक्रमांतर्गत मुलांचा शोध घेतला. गेल्या मे महिन्यात राज्यातील विविध रेल्वेस्थानक, रेल्वेगाडी, रेल्वेस्थानक परिसरात १६३ मुल-मुली सापडल्या. यामध्ये १३३ मुले आणि ३० मुलींचा समावेश आहे. या मुलांना चाईल्डलाइन या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या पालकांच्या सुपूर्द करण्यात आले. नागपूर विभागात १४ मुले आढळून आली. त्यापैकी पाच मुले आणि नऊ मुलींचा समावेश आहे, अशी माहिती मध्य रेल्वेने दिली.