गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल होणाऱ्या १७ ई आणि डिजिटल बसचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण केले जाणार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून शहरात इलेक्ट्रीक बस दाखल झाल्या आहेत. मात्र, त्याची सुरुवात करण्यात आली नव्हती. एकूण ४० बसेस पैकी १७ बसेस शहरात दाखल झाल्यानंतर आज सोमवारी संविधान चौकात सायंकाळी ६ वाजता नागरिकांच्या सुविधेसाठी ई आणि डिजिटल बसचे लोकार्पण होईल.
आमदार नागो गाणार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे यांची उपस्थिती राहणार आहे. कार्यक्रमाला नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे यांनी केले आहे.