चंद्रपूर : लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन पूर्णपणे सज्ज आहे. निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढवण्यावर भर आहे. एकूण १८ लाख ३६ हजार ३१४ मतदार आहेत. आयोगाने १ एप्रिल २०२४ रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाऱ्यांनाही लोकसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क दिल्याने २७ मार्चपर्यंत मतदारांना नोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी दिली. निवडणुकीत एकूण १२ हजार ४०३ अधिकारी व कर्मचारी कार्यरत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन, अतिरिक्त पोलीस अधीक्षक रिना जनबंधू, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी गौडा यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीची माहिती दिली.

हेही वाचा : प्रचारासाठी अल्प वेळ, उमेदवारांची होणार दमछाक !

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात राजुरा, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, वणी आणि आर्णी या सहा विधानसभा मतदारसंघाचा आहे. एकूण १८ लाख ३६ हजार हजार ३१४ मतदार आहेत. यात ९ लाख ४५ हजार २६ पुरुष मतदार, ८ लाख ९१ हजार २४० स्त्री मतदार आणि इतर ४८ जणांचा समावेश आहे. तर गडचिरोली लोकसभा मतदारसंघातील ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात १ लाख ३६ हजार ३८८ पुरुष मतदार, १ लाख ३४ हजार ८४० स्त्री मतदार असे एकूण २ लाख ७१ हजार २२८ मतदार आहेत. तर चिमूर विधानसभा मतदारसंघात १ लाख ४० हजार १९७ पुरुष मतदार, १ लाख ३६ हजार ६२७ स्त्री मतदार असे एकूण २ लाख ७६ हजार ८२४ मतदार आहेत. तसेच चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात १८ ते १९ वयोगटात एकूण २४ हजार १२० मतदार आहेत. जिल्ह्यात एकूण मतदान केंद्रांची संख्या २०४४ असून चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात २११८ मतदान केंद्र आहेत. मतमोजणी एमआयडीसी येथील वखार महामंडळात ४ जून रोजी होणार आहे.