नागपुरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका २७ वर्षीय तरुणानं १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी मागील दोन वर्षांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता. दरम्यान १० मे रोजी आरोपीनं पीडित मुलीच्या घरी जाऊन तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक संबंध ठेवले. यानंतर पीडित मुलीनं संबंधित प्रकार आपल्या आईला सांगितला. याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक केली आहे.

अमितेश आशिष श्रीवास (२७, गिट्टीखदान) असं अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी दहावीच्या वर्गाची विद्यार्थिनी आहे. ती आठवीत असतानाच आरोपी अमितेश यानं तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं होतं. ‘आपण लग्न करू, सुखाचा संसार असेल, मुंबईत घर घेऊ’ अशी पूर्ण न होणारी स्वप्न आरोपीनं तिला दाखवली होती. यामुळे ती आरोपीच्या जाळ्यात अलगद अडकली.

१८ मे २०२० मध्ये आरोपीनं तिला आपल्या घरी बोलावलं होतं. तिला लग्नाचं आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केलं. गेल्या दोन वर्षांपासून तो तिच्याशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. पण दहावीचं वर्ष असल्यामुळे अभ्यास करण्यासाठी मुलीने अमितेशकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे तो चिडून तिला बदनामीची धमकी देत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, १० मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास आरोपी अमितेश पीडित मुलीच्या घरी आला होता. यावेळी त्यानं पीडितेशी बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित करत जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर घाबरलेल्या मुलीनं या घटनेची माहिती आपल्या आईला दिली. घटनेची माहिती मिळताच आईसह मुलीने जरीपटका पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे.